खानापूर लाईव्ह न्युज /प्रतिनिधी. : शिक्षक हा समाजाचा कणा आहे. शिक्षक नेहमी चांगले संस्कार आचार विचार व विद्या ज्ञानाचे काम करतात. त्यामुळे समाजात ताठ मानेने जगणारा कोण असेल तर तो शिक्षक होय. आज चापगाव मलप्रभा हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री व्ही. बी. होसूर हे आपल्या 37 वर्षाच्या प्रदीर्घ सेवेतून सेवानिवृत्त होत असले तरी त्यांचे कार्य व शैक्षणिक निष्ठा व शिक्षकांच्या साठी तसेच विद्यार्थ्यांच्या साठी त्यांची असणारी धावपळ ही सदोदित प्रेरणादायी ठरते. गेल्या 37 वर्षात त्यांनी शिक्षक म्हणून काम करत असताना अनेक माणसे जोडण्याचे काम केले. समाजात इतर शिक्षकांना सन्मानाने जगता येईल, यासाठी नेहमी प्रेरणा देण्याचे कार्य, शासकीय पातळीवर असणाऱ्या अडीअडचणी दूर करण्यासाठी कार्यतत्पर राहण्याची महत्त्वाची भूमिका त्यांनी बजावली आहे. असे असताना ते आज आपल्या प्रदीर्घ सेवेतील निवृत्त होत असले तरी त्यांच्या अंगी इतरांच्या बाबतीत असणारी तळमळ त्यांना कधीच निवृत्त करणार नाही. त्यामुळे आगामी काळातही ते असेच शैक्षणिक क्षेत्रात वाहून येऊन समाजापित्तकार्य करतील असा आशावाद खानापूरचे आमदार विठ्ठल हलगेकर यांनी चापगाव येथे दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळाचे मलप्रभा हायस्कूलचे मुख्याध्यापक व्ही. बी. होसुर यांच्या सेवानिवृत्ती सदिच्छा कार्यक्रमात प्रमुख अतिथी या नात्याने बोलताना व्यक्त केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन कमिटीचे अध्यक्ष पत्रकार पिराजी कुराडे होते.
यावेळी झालेल्या कार्यक्रमात व्ही. बी. होसूर यांच्या कार्याचा परिचय सहशिक्षक पी. बी पाटील यांनी करून दिला. त्यानंतर दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळाच्या वतीने सचिव विक्रम पाटील, संचालक पी.पी बेळगावकर, आदींच्या हस्ते सत्कार झाला. तर शाळा व्यवस्थापन कमिटी शिक्षक वर्ग तसेच आमदार विठ्ठल हलगेकर, माजी आमदार दिगंबर पाटील, चापगाव ग्रामपंचायत यांच्यावतीने सन्मान करण्यात आला. यावेळी त्यांचा कौटुंबिक गोतावळा, खानापूर तालुक्याच्या विविध शाळांमधून आलेल्या मुख्याध्यापक शिक्षक वर्ग, गोधोळी हायस्कूल शाळा व्यवस्थापन कमिटी, यासह विविध क्षेत्रातून त्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी मलप्रभा हायस्कूलच्या वतीने आमदार विठ्ठल हलगेकर यांचाही सन्मान करण्यात आला.
बोलताना दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळाचे सचिव विक्रम पाटील म्हणाले, दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळाने अनेक शिक्षक घडविले, त्या शिक्षकांनी अनेक विद्यार्थी घडवले, पण सरकारी नियमानुसार सेवानिवृत्ती वयाच्या 60 नंतर होतच असते. आज दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ ही संस्था आजी-माजी शिक्षकांच्या,प्राध्यापकांच्या संघटितेवर चालते, त्यामुळे संस्थेच्या भरभराटीत अनेक शिक्षकांचा मोठा सहभाग आहेच. खानापूर तालुक्यात आमच्या संस्थेच्या अनेक शाखांच्या समस्या सोडवण्यासाठी येथील गोरगरीब विद्यार्थ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी विविध कार्यतत्व राहिले आहेत. आज ते आपल्या 37 वर्षाच्या शेवटी निवृत्त होत असले तरी त्यांचे कार्य मंडळाच्या प्रगतीत कायम राहणार यात शंका नाही. शिक्षक हा कधीच सेवानिवृत्ती होत नसतो त्याची सेवा ही कार्य तत्पर असते. त्यामुळे उर्वरित आयुष्यात आपले कौटुंबिक सुखाचे जीवन करता करता संस्थेच्या हितासाठी ही त्यांनी कार्य तत्पर राहावे अशी सदिच्छा त्यांनी यावेळी दिली. संचालक बी.पी बेळगावकर म्हणाले, शैक्षणिक ज्ञानार्जनात व शिक्षकांच्या समस्या सोडवणे व शाळांच्या समस्या सोडवण्यासाठी विठ्ठल होसुर यांचे कार्य नेहमी मार्गदर्शन ठरले आहे. त्यांनी शैक्षणिक क्षेत्रात अनेक माणसे जोडून या शैक्षणिक क्षेत्राचा विकास करण्यासाठी त्यांची ही सेवा सत्कार मी ठरली असून त्यांनी या शैक्षणिक क्षेत्रात कायम निगडित राहावे असे सांगून त्यांच्या सेवानिवृत्ती सदिच्छा दिल्या.
यावेळी बोलताना कर्नाटक राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाचे सचिव सलीम कित्तूर म्हणाले, खानापूर तालुक्यातील कोणत्याही शैक्षणिक समस्या सोडवण्यासाठी व्ही. बी. होसुर व माझी सांगड ही कायम राहणारी. समाजासाठी झटणारा शिक्षक क्वचित असतोय .मात्र त्याने आपल्या उभ्या सेवेत केलेले कार्य हे मात्र कायम स्मरणात राहते. असे सांगून आपल्या जोड गोळीतील अनुभवाचे खिसे त्यांनी यावेळी सांगून त्यांच्या कौटुंबिक नात्याबरोबर शैक्षणिकतेत त्यांची असलेली भावनिकता व शिक्षकांच्या साठी असलेल तळमळ बोलून दाखवून सेवानिवृत्तीच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी व्यासपीठावरून कर्नाटक राज्य माध्यमिक शिक्षण संघाचे अध्यक्ष मठपती, माजी आमदार दिगंबर पाटील, निपाणी हून आलेले त्यांचे संघमित्र शिक्षक शिंत्रे, ग्रामपंचायत माजी अध्यक्ष रमेश धबाले यांनी त्यांच्या शिक्षकी सेवेबद्दल विचार मांडले. व शुभेच्छा दिल्या. सत्काराला उत्तर देताना मुख्याध्यापक होसुर म्हणाले, दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळांने मला घडवले, शिक्षण मंडळाच्या 37 वर्षाच्या सेवेत मंडळाने मला सेवा पुर्ततेसाठी कधीही काही कमी पडू दिले नाही. संस्थाही गोरगरीब व राबणाऱ्यांच्या कष्टाची चीज करून देणारी आहे. खानापूर तालुक्यात विविध ठिकाणी शिक्षकी सेवा बजावताना अनेक कमिटीचे सदस्य लाभले, अनेक आजी-माजी विद्यार्थी आपल्या कडून विद्याधानाचे दान घेऊन पुढे गेले, अशा विद्यार्थ्यांच्या पुढे आपण ताट मानेने जाण्याचे शिक्षण दिले आहे. याचा मला सार्थ अभिमान वाटतो. शिक्षकांना केवळ सेवार्थ नंतर माझ्या विद्यार्थ्यांनी दिलेला मान सन्मान हीच शिक्षकाच्या कार्याची खरी पोचपावती ठरते, असे भावनिक उद्गार व्यक्त करून संस्थेने तसेच चापगाव शाळा व्यवस्थापन कमिटीसह विद्यार्थ्यांनी दिलेली आपुलकी मला नेहमी उत्तेजन देण्याचे कार्य करील असा आशावाद व्यक्त करून त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.
अध्यक्षस्थानावरून बोलताना शाळा व्यवस्थापन कमिटीचे अध्यक्ष पिराजी कुऱ्हाडे म्हणाले, मुख्याध्यापक व्ही.बी. होसुर हे केवळ माझ्या शाळेचे मुख्याध्यापक नसून ते माझे या हायस्कूलमधील पहिले गुरु आहेत. सुरुवातीपासून त्यांनी दिलेले ज्ञानार्जन,प्रेरणा व उत्साह हीच आमच्या यशाची पायरी असून अशी गुरू प्रत्येकास लाभो अशी त्यांनी भावना व्यक्त करून विविध दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळाच्या मलप्रभा हायस्कूलमध्ये केलेली सेवा ही आजी-माजी विद्यार्थ्यास मार्गदर्शन ठरव असे विचार व्यक्त करून त्यांच्या सेवानिवृत्तीस शुभेच्छा दिल्या. यावेळी व्यासपीठावर ग्रामपंचायत अध्यक्ष स्नेहल पाटील, उपाध्यक्ष मारुती चोपडे, नवनिर्वाचित अध्यक्ष गंगाव्वा कुरबर, उपाध्यक्ष मालुबाई पाटील, ग्रामपंचायत सदस्य सूर्याजी पाटील, देवलतीचे स्वामी हिरेमठ, गटशिक्षणाधिकारी कार्यालयातील अधिकारी कमार, उद्योजक शिवाजी जळकेकर, विविध शाळातून आलेले मुख्याध्यापक निवृत मुख्याध्यापक शिक्षक वर्ग शाळा व्यवस्थापन कमिटीचे पदाधिकारी आजी-माजी विद्यार्थी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमात प्रास्ताविक स्वागत पी. बी. पाटील यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहशिक्षक तुकाराम सनदी यांनी तर आभार बेळगावकर यांनी मांडले.