खानापूर लाईव्ह न्युज/ प्रतिनिधी:
बेळगाव येथील प्रसिद्ध उद्योजक प्रशांत कौजलगी यांचे वडील सुरेश धोंडीराम कौजलगी (वय 84) रा. चिदंबर नगर, अनगोळ बेळगाव यांचे आज सायंकाळी आकस्मिक दुखद निधन झाले. ते ठळकवाडी हायस्कूल येथून प्रदीर्घ शिक्षकी सेवेतून निवृत्त झाले होते. त्यांच्या पश्चात पत्नी मुलगा, मुलगी, सून, जावई आणि नातवंडे असा परिवार आहे. अनगोळ स्मशानभूमीत आज रात्री 9 वाजता अंत्यसंस्कार होणार आहेत.