खानापूर लाईव्ह न्युज //प्रतिनिधी:
खानापूर तालुक्यात अंगणवाडी शिक्षिका व साहिकांच्या भरती प्रक्रियेला ऑनलाइन द्वारे अर्ज मागविण्यात आले आहेत. परंतु या भरती प्रक्रियेत कन्नड भाषा प्रथम असलेल्या महिलांनाच प्राधान्य देण्याचे आदेश निवड प्रक्रियेत देण्यात आले आहेत हे कन्नड तृतीय भाषा शिकलेल्या मराठीसह इतर भाषिकांच्या वर अन्यायकारक आहे . मराठी बहुल भागात गेल्या अनेक वर्षापासून ही तृतीय भाषा अनुसरून अनेक महिलांनी शिक्षण घेतले आहे. पण आज अंगणवाडी शिक्षिका भरतीत प्रथम अथवा द्वितीय भाषा कन्नड असेल त्यांनाच प्राधान्य देण्याचे आदेशात म्हटले आहे. मराठी बहुल भागात अंगणवाडी शिक्षिका व सहायिका निवड प्रक्रियेत कन्नड तृतीय भाषेलाही प्राधान्य देऊन निवड प्रक्रिया राबवावी अशी मागणी आमदार विठ्ठल हलगेकर यांनी सोमवारी बेळगाव सुवर्णसौध मध्ये आयोजित केडीपी बैठकीत केली.
तालुक्यात 49 शिक्षिका व 84 सहायिका भरती प्रक्रिया राबवण्यात आली आहे परंतु या भरती प्रक्रियेत प्रथम भाषा कन्नड असणे सक्तीचे असल्याचे आदेशात म्हटले यामुळे मराठी भागातील तृतीय भाषा कन्नड मधून शिक्षण घेतलेल्या उमेदवारांच्या वर हा अन्याय आहे एखाद्या ठिकाणी प्रथम भाषा कन्नड असलेला उमेदवार असेल त्याची निवड करण्यास आमची हरकत नाही. पण गुणात्मक शिक्षण आधारित तृतीय भाषा कन्नड असलेल्या उमेदवारांनाही यामध्ये निवड प्रक्रियेत प्रधान देण्यात यावे अशी मागणी महिला आणि बालकल्याण खात्याच्या मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्याकडे आमदार विठ्ठल हलगेकर यांनी या बैठकीत केली यावेळी याचा सहानुभूतीपूर्वक विचार करून निर्णय घेण्यात येईल असे महिला आणि बालकल्याण खात्याच्या मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी बैठकीत उत्तर दिले.