खानापूर लाईव्ह न्युज:
लोंढा: खानापूर तालुक्यात विशेषता लोंढा भागात अतिवृष्टी होत असल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. अशातच बेळगाव- पणजी राष्ट्रीय महामार्गापैकी लोंढे जवळ मोहीशेत क्रॉसच्या बाजूला नव्याने निर्माण करण्यात येत असलेल्या राष्ट्रीय महामार्गाच्या एका बाजूचा महामार्ग पूर्णतः खचला आहे. शिवाय एका ठिकाणी बांधण्यात असलेल्या पूलाजवळच्या बाजूचा मातीचा भरावा वाहून गेल्यामुळे हा रस्ता आता अवघड बनला आहे. खरंतर राष्ट्रीय महामार्गाचे काम धीम्या गतीने सुरू आहे.
खानापूर होणकल ,लोंढा ते रामनगर पर्यंतचा रस्ता म्हणजे पावसाळ्यातील मरणयात्राच म्हणावी लागेल. सुसज्य बांधणी आणि योग्य नियोजन असल्याने या रस्त्याचे काम व्यवस्थित झाले नाही. अनेक ठिकाणी रस्ता बांधण्यासाठी टाकण्यात आलेला मातीचा भराव निष्कृष्ट असल्याने जमीन खचली जात आहे. अशाच प्रकारे लोंढ्याजवळ रस्त्याच्या बाजूला असलेल्या खंदकात पाणी साचल्याने महामार्गासाठी टाकण्यात आलेला भरावाच वाहून गेला . शिवाय डांबरीकरणालाही तडे गेल्याने असाच पाऊस सुरू झाल्यास या ठिकाणचा महामार्ग बंद होण्यास वेळ लागणार नाही. इकडे महामार्गाचे काम अर्धवट सलाईन वर असताना दुसरीकडे मात्र महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी गणेबैल नजीक टोल प्लाझा सुरू करून वाहनधारकांना लुटण्यासाठी मात्र तयार झाले आहेत. वाह…रे प्राधिकरणा?