Khanapur:
रविवारी दिवसभर पावसाने जोरात मुसंडी मारली आहे तालुक्याच्या सर्व भागात जोराचा पाऊस सुरू असल्याने अनेक घरांची पडझड शिवाय अनेक रस्ते बंद झाले आहेत. गावागावांना जोडणारे संपर्क रस्ते त्यात कमी उंचीची मोरी, ब्रिज असणारे रस्ते पाण्याखाली गेल्याने रस्त्यावरील वाहतूक थबकली आहे. खानापूर शहरापासून जवळ असलेल्या कुपटगिरी गावाला जोडणाऱ्या जुन्या रोडवरील गावानजीच्या नाल्यावर पाणी आल्याने या रस्ता संपर्क तुटला आहे. सकाळपासून तीन फूट पाणी आले आहे. त्यामुळे या रस्त्यावरून होणारी वाहतूक धोक्याची बनली आहे. तरी नागरिकांनी जुन्या रोडवरून न येता पारीश्वाड रोड मार्गे प्रवास करावा असे आवाहन करण्यात आले आहे.