6 विरोधी 2 मतांनी विजयी : उपसरपंचपदी सीता सुतार बिनविरोध
पारवाड; ग्रामपंचायतच्या अध्यक्ष उपाध्यक्ष पदाची निवडणूक नुकताच पार पडली. चुरशीची झालेल्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भिकाजी गावडे हे निवडून आले. तर उपाध्यक्षपदी गीता रामा सुतार यांची बिनविरोध निवड झाली आहे.
पारवाड ग्रामपंचायतच्या अध्यक्षपदाचे आरक्षण सामान्य गटासाठी आले होते. त्यामुळे एकूण 8 सदस्य संख्या असलेल्या या ग्रामपंचायतीत या पदासाठी दोन गट निर्माण होऊन चूरस निर्माण झाली होती. यामध्ये भिकाजी गावडे यांनी जपलेल्या सामाजिक बांधिलकीची जाण लक्षात घेता ग्रामपंचायत सदस्यांनी त्यांच्या बाजूने कौल दिला. व या निवडणुकीत त्यांना 6 मते मिळाली तर विरोधक असलेले सुनील पवार यांना 2 मते मिळाली. स्वागत ग्रामपंचायत विकास अधिकारी वीरेश सज्जन यांनी केले.
ग्रामपंचायत क्षेत्रातील गावांच्या विकासासाठी प्रयत्न करणार; भिकाजी गावडे
या ग्रामपंचायत क्षेत्रात एकूण सात गावांचा समावेश आहे. दुर्गम आणि खेड्यांना जोडलेल्या या गावाच्या विकासासाठी जनतेची प्रयत्नाची अपेक्षा आहे.त्यानुसार प्रत्येक गावात ग्रामपंचायतीमार्फत येणाऱ्या सुविधा तसेच संपर्क रस्ते पूर्ण करण्यासाठी आपल्या 30 महिन्याच्या कालावधीत आपण प्रयत्न करू असे यावेळी नवनिर्वाचित अध्यक्ष भिकाजी गावडे यांनी व्यक्त केले.