खानापूर /प्रतिनिधी ; बरगाव ग्रामपंचायत अध्यक्ष उपाध्यक्ष पदाची निवडणूक शुक्रवारी पार पडली अखेरच्या क्षणी अध्यक्षपदासाठी एकमेव आर झाल्याने सौ. चांगुना हनुमंत पाटील यांची बिनविरोध निवड झाली. तर उपाध्यक्ष पदासाठी मोठी चिरस निर्माण झाली यामध्ये प्रवीण पाटील यांनी सहा मते घेऊन विजयी ठरले. या ग्रामपंचायतीच्या अध्यक्ष उपाध्यक्ष पदासाठी ही चूरस निर्माण झाली होती. या ग्रामपंचायतचे अध्यक्षपद सामान महिला गटासाठी तर उपाध्यक्षपद सामान्य गटासाठी आले होते. एकूण 10 सदस्य संख्या असलेल्या या ग्रामपंचायतीत अध्यक्षपदासाठी मोठी चुरस निर्माण होणार होती पण चांगुना पाटील यांचा ऐनवेळी उमेदवारीसाठी अर्ज आल्यानंतर कुपटगिरी गावातील सदस्याने गप्प राहणे पसंत केले. तर उपाध्यक्ष पदासाठी सहा विरुद्ध पाच अशा पद्धतीने मतदान झाले. यामध्ये उपाध्यक्षपदी प्रवीण पाटील यांची निवड झाली आहे. निवडणूक अधिकारी म्हणून पशुवैद्याधिकारी उमेश होसुर यांनी काम पाहिले. उभयतांच्या निवडी बद्दल ग्रामपंचायतीच्या वतीने ग्रामपंचायत विकास अधिकारी प्रकाश इंगळे, सेक्रेटरी घाडी तसेच ग्रामस्थांच्या वतीने त्यांचे अभिनंदन करण्यात आले. नवनिर्वाचित अध्यक्षा चांगुना पाटील या कुपटगिरी येथील ग्रामपंचायत विकास अधिकारी हनुमंत पाटील यांच्या धर्मपत्नी आहेत. त्यांच्या निवडीबद्दल अभिनंदन होत आहे.