खानापूर : खानापूर तालुक्यातील हलशी ग्रामपंचायतीची निवडणूक प्रत्येक वेळी चर्चेत असतेच. या ग्रामपंचायतीच्या सत्तेत चिकटून बसलेल्या प्रस्थापितांना धक्का देण्यासाठी अनेक वेळा प्रयत्न झाले, पण ते असफल ठरले होते. पण या वेळेच्या ग्रामपंचायतीच्या अध्यक्ष उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत सत्ताधीकाऱ्यांना धूळचारत हलशी ग्रामपंचायतीवर सत्ता बदल करण्यात माजी आमदार अरविंद पाटील यांनी शड्डू ठोकला. स्थानिक कार्यकर्त्यांच्या अपेक्षित फळीला साथ देत ग्रामपंचायतीत सत्ता बदल केली. व ग्रामपंचायतीच्या अध्यक्षपदी पांडुरंग लक्ष्मण बावकर यांना विजयाची माळ घालण्यात यशस्वी ठरले. तर उपाध्यक्षपदी आश्विनी देसाई यांची अविरोध निवड झाली.
हलसी ग्रामपंचायतच्या तक्तावर कोण विराजमान होणार याकडे संपूर्ण खानापूर तालुक्याची लक्ष होते. या ग्रामपंचायतीवर येथील हंजी घराण्याने नेहमी आपले वर्चस्व राखले होते. यावेळी देखील ग्रामपंचायत सदस्य संतोष हंजी यांनी लॉबिंग ठेवून ग्रामपंचायतीवर आपलाच झेंडा फडकवण्यासाठी साम दाम दंड लावून ताकद लावली होती. पण ती असफल ठरली.
मिळालेल्या माहितीनुसार या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत एका मंत्राच्या मुलाने ही हस्तक्षेप केला. यासाठी विरोधी गटाला दाबण्यासाठी काही समर्थकांचाही गराडा ठेवला होता. पण सत्तेच्या ताकतीला न जुमानता माजी आमदार अरविंद पाटील यांनी स्थानिक कार्यकर्त्यांची फळी उभारून निवडणुकीला शब्द टाकला. व या निवडणुकीत अकरा पैकी सहा मते मिळवून पांडूरंग बावकर यांनी बऱ्याच वर्षापासून पंचायतीवर कब्जा केलेले केएलई संस्थेचे संचालक संतोष हंजी यांचा दणदणीत पराभव केला .
हलशी ग्राम पंचायतीच्या निवडणुकीसाठी कडकोट पोलीस बंदोबस्तासह विरोधकांनी चक्क मंत्र्यांचे ‘वजन’ वापरून मोठा समुदाय जमविला होता. पण, नेहमीप्रमाणेच बेळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक माजी आमदार अरविंद पाटील यांनी विरोधकांचा डाव उधळून लावत पांडुरंग बावकर यांना विजयी केले. तर उपाध्यक्षपदी अश्विनी देसाई यांची बिनविरोध निवड केली. काँग्रेसचे युवा नेते मृणाल हेबाळकर यांनी सुद्धा हलशी येथे उपस्थित राहून संतोष हंजी यांच्या विजयासाठी प्रयत्न चालविले होते. पण, त्यांना आल्या पावली ‘हात’ हलवीत परतावे लागले. तालुक्यात आमचेच वर्चस्व आहे, आम्ही स्थानिकांना न्याय देण्यासाठी आणि तालुक्याच्या विकासासाठी कार्यरत आहोत. त्यामुळे कुणीही येथील राजकारणात ढवळाढवळ करून वातावरण बिघडण्याचा प्रयत्न केल्यास स्थानिक जनताच त्यांना धडा शिकवेल. तेच हलशीच्या निवडणुकीतून स्पष्ट झाल्याचे दिसून आले.