खानापूर /प्रतिनिधी: निलावडे ग्रामपंचायतच्या अध्यक्ष उपाध्यक्ष पदाची निवडणूक शुक्रवारी चुरशीने पार एकूण दहा सदस्य असलेल्या या ग्रामपंचायतीत परस्पर दोन गट निर्माण झाले होते. यामध्ये चुरशीने झालेल्या निवडणुकीत अध्यक्षपदी अरुण नामदेव गावडे तर उपाध्यक्ष पदी पार्वती परसराम मुतगेकर यांची निवड झाली आहे यांची निवड झाली होती.
अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी अरुण नामदेव गावडे व लक्ष्मी ओमाना यांच्यात चुराचा निर्माण झाली होती तर उपाध्यक्ष पदासाठी आरती अर्जुन कांबळे विरुद्ध पार्वती मुतगेकर यांच्यात निवडणूक झाली.
ग्रामपंचायत एकूण संख्याबळ 10 असताना दोन्ही गटाने ताकतीचा वापर करून सदस्यात विभाजन झाले. सुदैवाने झालेल्या मतदानात दोन्ही गटाला 5 विरुद्ध 5 अशी मते पडल्याने अध्यक्ष निवडीचा पेच पडला. अखेर निवडणूक अधिकारी यांनी दोन्ही पदासाठी चिठ्ठीद्वारे निवड करण्याचा निर्णय घेतला. यामध्ये अध्यक्षपदासाठी अरुण नामदेव गावडे यांची तर उपाध्यक्ष पदासाठी पार्वती परशराम मुतगेकर यांची निवड झाली. ग्रामपंचायत सदस्य विनायक मुतगेकर, महादेव कवळेकर, परशुराम गावडे, वंदना हंनबर, रेणुका सेंगाळे, सहदेव पाटील या सदस्यांनी मतदानात भाग घेतला. निवडणूक अधिकारी म्हणून कळसा प्रकल्पाचे कार्यकारी अभियंते मराठी यांनी काम पाहिले. उभयतांच्या निवडीबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यात आले.