खानापूर : तालुक्यातील बहुतांश कृषी पतीन सहकारी संघाच्या निवडणुका पार पडल्या त्यानुसार अध्यक्ष उपाध्यक्ष पदाच्या निवडणूक काही सुरू आहेत. माजी आमदार व जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक अरविंद पाटील यांच्या पुढाकाराने बहुतांश सोसायटीमध्ये बिनविरोध निवड झाली आहे. मंगळवारी प्राथमिक कृषी पतीन सहकारी संघाच्या अध्यक्ष उपाध्यक्ष यांची निवड झाली. बेकवाड प्राथमिक कृषी पतीन सहकारी संघाच्या अध्यक्षपदी कृष्णाजी वसंत पाटील यांची निवड करण्यात आली आहे. तर उपाध्यक्षपदी जक्काप्पा भरमन्ना बाळेकुंद्री यांची निवड करण्यात आली आहे. यावेळी संचालक जनकपा महादेव पाटील, मनोहर रामचंद्र पाटील, श्रीमंती नागोजी केसरकर,सुमन नामदेव गुरव, गुरूपाद यल्लाप्पा कोलकार, मंजुनाथ पुंडलिक पाटील, गुंडू बाळू सुतार, सुहास विजय पाटील आदी उपस्थित होते.
त्याचप्रमाणे हे बाळ प्राथमिक कृषीपतीन सहकारी संघाच्या अध्यक्षपदी विठ्ठल रामचंद्र राऊत, यांची निवड करण्यात आली आहे. तर उपाध्यक्षपदी शालन भालचंद्र पाटील झाडनावगा यांची निवड करण्यात आली आहे. सदर अध्यक्ष उपाध्यक्ष पदाच्या निवड प्रसंगी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक माजी आमदार अरविंद पाटील माजी जिल्हा पंचायत सदस्य ज्योतिबा रेमाणि उपस्थित होते. त्यांच्या निवडीबद्दल त्यांचे अभिनंदन होत आहे.