बेळगाव : बेळगाव पणजी राष्ट्रीय महामार्ग पैकी खानापूर होनकल,गणेबैल दरम्यान महामार्गात जमीन गेलेल्या ज्या शेतकऱ्यांना अद्याप नुकसान भरपाई मिळाली नाही. त्या शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी भूसंपादन अधिकारी अनुराधा वस्त्रद यांनी बेळगाव येथे विशेष बैठक बोलावून शेतकऱ्यांची समस्या जाणून घेतली. दरम्यान खानापूर तालुक्यातून अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या आहेत अनेक ठिकाणी संपर्क रस्ते अर्धवट आहेत शिवाय महामार्गाचे कामही अर्धवट असताना गणेश टोलनाका सुरू करण्याची घाई करू नये असा प्रश्न उपस्थित शेतकऱ्यांनी महामार्ग प्राधिकरणाच्या भूसंपादन अधिकारी अनुराधा वस्त्रद त्यांच्याकडे केली. सोमवारी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण कार्यालय शिवबसव नगर बेळगाव येथे स्पेशल लँड एक्वीजीशन ऑफिसर वस्त्रद मॅडम यांची भेट घेऊन महामार्गात शेती गेलेल्या शेतकऱ्यांना भरपाई लवकरात लवकर मिळवून द्यावी तसेच हलकर्णी हत्तरगुंजी होनकल सेवा रस्ता लवकरात लवकर मंजूर करावा. व होनकल ते रामनगर महामार्ग पूर्ण होई पर्यंत टोल वसुली बंद करावी यासाठी भाजपा नेत्यांनी व शेतकऱ्यांनी भेट घेऊन चर्चा केली. यावेळी वस्त्रद यांनी शेतकऱ्यांची समस्या दूर करून शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याचे आश्वासन दिले. यावेळी उपस्थित भाजपा जिल्हाध्यक्ष प्रमोद कोचेरी, तालुका अध्यक्ष संजय कुबल, प्रधान प्रधान कार्यदर्शी गुंडू तोपिंनकट्टी ,भाजपा नेते मारुती पाटील, कल्लाप्पा घाडी , एम आर पाटील , शिवाजी पाटील, मोहन पाटील नितीन पाटील ,यल्लाप्पा चौगुले ,प्रवीण पाटील, रवींद्र गुरव, मारुती सुंडकर ,अमोल जवरूचे, नामदेव बेळगावकर, गंगाराम नारायण गुरव, गणपती गुरव अण्णा घाडी, गंगाराम गोपाळ गुरव तसेच हलकर्णी खानापूर, करंबळ सावरगाळी येथील बहुसंख्य शेतकरी बांधव उपस्थित होते.