IMG-20230716-WA0062


कर्नाटक राज्य ज्येष्ठ नागरिक संघटना र. घटक
खानापूर यांची नुकतीच खानापूर श्री ज्ञानेश्वर मंदिर मध्ये मासिक बैठक पार पडली या बैठकीत ज्येष्ठ नागरिक संघटना अनेकांच्या सहकार्यातून यशस्वी वाटचाल करत असून नजीकच्या काळात अनेक सभासद यामध्ये समाविष्ट करून जेष्ठांना न्याय देण्याचा प्रमाणित प्रयत्न करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी संघटनेचे अध्यक्ष बनवशी सर होते. प्रमुख पाहुणे म्हणून श्री चांगाप्पा निलजकर तोपिनकट्टी महालक्ष्मी संस्थापक संचालक अरविंद कुलकर्णी, योगगुरु हलकर्णी ,सुभाष देशपांडे, ज्येष्ठ नागरिक संघटनेचे सर्व पदाधिकारी आणि श्री देवेगौडा चारिटेबल ट्रस्ट हॉस्पिटलचे बेळगाव येथील डॉ. फरात मुल्ला व डॉ. नागराज राठोड व खानापूर तालुक्यातील सर्व ज्येष्ठ नागरिक यांच्या उपस्थितीत भव्य असा जनहित व जनजागृती कार्यक्रम संपन्न झाला. या संघटनेला खानापूरचे आमदार विठ्ठल हलगेकर यांनी आपण एक ज्येष्ठ नागरिक असून या संघटनेला वेळोवेळी सहकार्य करण्याचे आश्वासन मागील बैठकीत केले असून त्याचेही या बैठकीत अभिनंदन करण्यात आले.

प्रारंभी श्रीमती उमा अंगडी यांनी इशस्तवन व स्वागत गीत म्हणून सर्वांचे स्वागत केले मान्यवरांच्या हस्ते दैवतांच्या प्रति म्हणजे पूजन व मान्यवरांचा स्वागत समारंभ पार पडला. प्रास्ताविक संघटनेचे उपाध्यक्ष आबासाहेब दळवी यांनी करून अहवाल वाचन केला. खानापुरातील एक उद्योजक व पतंजली योग संस्थेचे अरविंद कुलकर्णी , मांजरीस हॉटेलचे मालक सुभाष देशपांडे, बेळगाव चारिटेबल हॉस्पिटलचे देवेगौडा, तसेच माजी ता.प. सदस्य चांगाप्पा निलजकर यांचा यावेळी सन्मान करण्यात आला.


या संघटनेत अनेक ज्येष्ठ नागरिक आहेत. प्रत्येक ज्येष्ठ नागरिकांचा सन्मानाने जन्मदिन साजरा करण्याचा निर्णय या संघटनेने घेतला असून या मासिक बैठकीत उपस्थित हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक एल डी पाटील यांच्या जन्मदिनाचे अवचित साधून त्यांचाही सत्कार करण्यात आला.
तसेच या महिन्यामध्ये जन्मदिन असणाऱ्यांचे जन्मदिन ऑगस्ट मासिक बैठकीमध्ये करण्याची ठरले.
योगगुरूंच्या समवेत जागतिक योगादिन, योगासने ,प्राणायाम, प्रत्याहार याची प्रात्यक्षिके करण्यात आली. श्री देवेगौडा चॅरिटेबल ट्रस्ट च्या डॉक्टरांच्या कडून मोफत आरोग्य तपासणी व बीपी व शुगर तपासून मोफत औषधे व हेल्थ कार्ड आयुष्मान भारत कार्ड करिता नोंदणी करण्यात आली. यावेळी 70 नागरिकांनी या सेवेचा लाभ घेतला व योगा अभ्यास करण्यात आला.
अध्यक्षांनी या महिन्याचे उपक्रमामध्ये मोफत नेत्र तपासणी व उपचार आणि मोफत चष्मे देण्याकरिता शिबिर भरवण्याचे आवाहन केले आहे. तसेच नवीन सभासद जास्तीत जास्त नोंदणी करावे असे आवाहन केले.
ज्येष्ठ नागरिक नागरिक व निवृत्त मुख्याध्यापक एल डी पाटील यांनी सूत्रसंचालन केले. या डी. एम .भोसले प्राथमिक जेष्ठ शिक्षक संघटना अध्यक्ष, सर्व पदाधिकारी जनरल सेक्रेटरी श्रीयुत पवार, जॉइंट सेक्रेटरी बेनकटी , वाघमारे , जिगजीनी, कोळींदरे , सावंत, महिला प्रतिनिधी एल, बोरजिस संघटनेतील सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ पदाधिकारी व सर्व सभासद तसेच खानापूर तालुक्यातील अनेक ज्येष्ठ नागरिकांचे व समस्त तालुका नागरिकांचे तसेच श्री ज्ञानेश्वर मंदिर ट्रस्ट चे पदाधिकारी उपस्थित होते.

Do Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Us