खानापूर – रामनगर रस्त्यावरील गुंजीनाजिक एक कचरा वाहू डंपर पलटी झाल्याने दुर्गंधी पसरली आहे. रविवारी रात्री नऊच्या सुमारास रस्त्या बाजूला असलेल्या विद्युत खांबाला धडक देऊन डंपर पलटी झाला. यामध्ये चालक सुदैवाने बचावला आहे. विद्युत कामाला धडक दिल्याने विद्युत वाहिन्या तुटल्यावर गावातील वीज पुरवठा ही खंडित झाला होता. लागलीच हेस्कॉम खात्याचे अधिकाऱ्यांना बोलावून विद्युत पुरवठा सुरळीत करण्यात आला. पण पलटी झालेल्या डंपरमुळे गावच्या वेशित दुर्गंधीचे साम्राज पसरले आहे.आजूबाजूला लोक वस्ती आहे डंपर पलटी झाल्याने सकाळपासून आजूबाजूच्या नागरिकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यासाठी तातडीने सदर कचरा व डंपर हटवून येतील दुर्गंधी हटवावी अशी मागणी येथील स्थानिक नागरिकांनी केली आहे.