खानापूर :
युवा वैज्ञानिक प्रकाश पेडणेकर यांनी संघर्ष आणि जिद्दीच्या जोरावर इस्त्रोसारख्या संस्थेत काम करताना देशासाठी दिलेले योगदान कौतुकास्पद आहे. तालुकावासियांना त्यांचा सार्थ अभिमान घेऊन तालुक्याचे नाव उज्ज्वल केले आहे. खानापूर तालुक्यात प्रकाश पेडणेकर सारखे होतकरू तरुण निर्माण व्हावेत हीच आमची अपेक्षा आहे. यासाठी आपण सदैव तयार असल्याची ग्वाही आमदार हलगेकर यांनी दिली
त्याचप्रमाणे चांद्रयान- ३ मोहिमेत सहभाग घेतलेल्या पेडणेकर यांच्या मातापित्यांची भेट घेऊन प्रकाश पेडणेकर यांनी खानापूर तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला असल्याचे गौरव उद्गार व्यक्त करून त्यांचे अभिनंदन केले आहे दरम्यान अनगडी (ता. खानापूर) येथे पेडणेकर यांचे वडील नारायण आणि आई सुनीता यांची अनगडी येथे जाऊन भेट घेतली. पुत्राच्या जडणघडणीत पालकांचा वाटाही मोलाचा असल्याचे सांगून त्यांचा शाल आणि पुष्पगुच्छ देऊन तालुक्याच्या वतीने सत्कार केला. यावेळी शिवाजी पाटील, लक्ष्मण गुंडप, संजीव वाटुपकर, प्रल्हाद पाटील, गेणाप्पा वाटुपकर, दत्ताराम सुतार, आप्पान्ना बरगावकर, वामन पाटील, मधुकर सुतार, पांडुरंग मिराशी, विश्वनाथ मिराशी, योगेश सुतार, राजू लक्केबैलकर, रविचंद्र पाटील आदी उपस्थित होते.