जांबोटी /वार्ताहर
जांबोटी येथील दि जांबोटी मल्टीपर्पज को ऑफ सोसायटीची सन 2023 ते 2028 या सालाची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध झाल्यामुळे सभासद वर्गातून समाधान व्यक्त होत आहे
या सोसायटीच्या संचालक मंडळाच्या एकूण 15 जागांसाठी 25 उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले होते. मात्र त्यापैकी एक उमेदवारी अर्ज अवैध ठरविण्यात आला. अर्ज माघारी घेण्याच्या अखेरच्या दिवशी निवडणूक टाळण्यासाठी त्यापैकी नऊ उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतल्यामुळे ही निवडणूक बिनविरोध झाली असून त्यामध्ये सामान्य गटातून सोसायटीचे संस्थापक चेअरमन विलास बेळगावकर, पुंडलिक नाकाडी, शंकर कुडतुरकर, विद्याधर बनोशी, पांडुरंग नाईक, खाचापा काजूनेकर, हनमंत काजूनेकर, यशवंत पाटील, पुंडलिक गुरव ,तसेच महिला राखीव गटातून सरस्वती अशोक पाटील, गीता विलास इंगळे,अ वर्ग राखीव मधून भैरू वाघू पाटील, ब वर्ग राखीव मधून शाहू गुरव एस सी राखीव मधून भाऊ कुर्लेकर, एस टी राखीव मधून भरमानी नाईक, यांची संचालक पदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे. निवडणूक अधिकारी म्हणून खानापूरचे सहकार विकास अधिकारी नवीन कुमार हुलगुंद यांनी काम पाहिले.
जाबोटी मल्टीपर्पज को ऑफ सोसायटी ही खानापूर तालुक्यातील पहिलीच पतसंस्था असून या सोसायटीच्या संचालक मंडळाची सलग नववी निवडणूक बिनविरोध झाल्यामुळे सभासद वर्गातून समाधान व्यक्त होत आहे