खानापूर प्रतिनिधी ; सरकारी प्राथमिक शाळा सुसज्ज व आकर्षित करून शाळेची पटसंख्या वाढवण्यासाठी नेहमीच प्रयत्न आहेत सरकारी कन्नड असोत अथवा मराठी प्राथमिक शाळा असो या शाळा आधुनिक पद्धतीने सुधारित करून मुलांना आकर्षित करण्यासाठी अनेक उपक्रम राबवले जातात, कधी शाळेत डिजिटल वर्ग करणे किंवा शाळा परिसरात शिष्यवृत्तीकरण करण्यासाठी विविध प्रकारे अनुदान मंजूर केले जात आहे. अशाच प्रकारे तालुक्यातील शिंदोळी ग्रामपंचायतने माणिकवाडी येथील सरकारी मराठी प्राथमिक शाळेचे आवारात पेवर्स बसवण्यासाठी ग्रामपंचायतीमधून निधी मंजूर केला आहे. सदर निधी अंतर्गत कामाचा शुभारंभ शनिवारी ग्राम पंचायत सदस्य प्रा शंकर गावडा, ग्रामपंचायत सदस्या सौ.प्रीती गोरल यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी ग्रामपंचायतीचे विकास अधिकारी प्रभाकर भट उपस्थित होते. या कामासाठी रोहयोअंतर्गत तीन लाखाचा निधी मंजूर करण्यात आला असल्याची माहिती दिली. यावेळी शाळा व्यवस्थापन कमिटीचे अध्यक्ष कुमाणा पाटील,ग्रामपंचायत चे क्लार्क प्रकाश मादार, शाळेचा शिक्षक वर्ग, कंत्राटदार, आणि विद्यार्थी वर्ग उपस्थित होते..