बेळगाव; सेंट अँटोनी इंग्लिश मीडियम हायस्कूल फिश मार्केट जवळ कॅम्प बेळगाव येथे उद्या शुक्रवार दि. 14 व शनिवार दि. 15 रोजी दोन दिवशीय स्काऊट गाईड आणि रोवर रेंजर वर्कशॉप बेसिक तसेच विविध संदर्भात प्रशिक्षण शिबिराचे सकाळी 10 वा. उद्घाटन होणार आहे. या शिबिरामध्ये 450 ( साडेचारशे ) पेक्षा अधिक प्राध्यापक सहभागी होणार आहेत. या शिबिराचे उद्घाटन व मार्गदर्शक म्हणून कर्नाटक राज्याचे माजी मंत्री आणि राज्य मुख्य आयुक्त भारत स्काऊट अँड गाईड बेंगलोर चे मुख्य प्रतिनिधी, समाजसेवक श्री पी. जी. आर. शिंदिया उपस्थित राहणार आहेत.
बेळगाव विभागीय नऊ जिल्ह्यामधील शिक्षक आणि पदवी पूर्व महाविद्यालयातील प्राध्यापक तसेच पदवी महाविद्यालयातील प्राध्यापकांसाठी विशेष स्काऊट गाईड आणि रोवर रेंजर बेसिक वर्कशॉप प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये स्काऊट गाईड आणि रोवर रेंजर चे तालुका, जिल्हा, राज्य, आणि राष्ट्रीय , आंतरराष्ट्रीय स्तरावरील विशेष असे प्रशिक्षण सर्वांपर्यंत पोहोचवण्याकरिता प्रयत्न मुख्य उद्देश आहे. . भारत देश आणि राजांचा विकास साधण्याकरिता बाल वयातच मूल्य शिक्षण व्यायामाचे महत्त्व शिक्षणाचे महत्त्व समाजकारण अर्थकारण राजकारण संशोधन अशा विविध क्षेत्रांचा अभ्यास योग्य वेळेला विद्यार्थ्यांची पोचवला गेला तर सुदृढ समाज निर्मितीसाठी महत्त्वाचा घटक ठरेल असा उद्देश या प्रशिक्षणातून दिला जाणार आहे. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षण विभाग जॉईन डायरेक्टर धारवाड आणि भारत स्काऊट गाईडचे चीफ कमिशनर बेळगाव जिल्ह्याचे श्री गजानन मंन्नीकेरी , बेळगाव जिल्हा भारत स्काऊट गाईडच्या मार्गदर्शिका आणि पदाधिकारी श्रीमती प्रभावती पाटील प्रमुख पाहुणे उपस्थित राहणार आहेत.
तरी भारत स्काऊट गाईड आणि रोवर रेंजर संस्थेच्या बेळगाव जिल्हा विभागाच्या वतीने नऊ जिल्ह्यातील सर्व पदवी पूर्व महाविद्यालय आणि पदवी महाविद्यालय येथील प्राध्यापकांनी उपस्थित राहून ज्ञानात भर घालावी असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आलेले आहे.