खानापूर / प्रतिनिधी
कौटुंबिक जाचाला कंटाळून विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली. गुंडुपी (ता. खानापूर) गावात ही दुर्दैवी घटना घडली. सबा मुजावर असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे.
याबाबत प्राप्त माहितीनुसार, पती मुजाहिद्दीन मुजावर, सासरा शब्बीर मुजावर, सासु दिलशाद मुजावर हे सबा मुजावर हिला स्वयंपाक व्यवस्थित करता येत नसल्याने त्रास देत होते. तिला कुठेही बाहेर जाण्यास विरोध होता. या त्रासाला कंटाळून सबा हिने गळफास घेऊन आत्महत्या केली.
याप्रकरणी सबा मुजावर हिची आई बसेरा साहेबखान यांनी नंदगड पोलीस स्थानकात फिर्याद दिली असून पोलीस अधिक तपास करत आहेत.