खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्यां नूतन कार्यकारणीची निवड घोषित करण्यात आली आहे यासंदर्भात खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची गेल्या 10 जुलै रोजी इदलहोंड येथे माजी आमदार दिगंबराव पाटील, माजी सभापती मारुतीराव परमेकर यांच्या उपस्थितीत माजी जिल्हा पंचायत सदस्य जयराम देसाई कृष्णा कुंभार कृष्णा मनोळकर, मारुती देवाप्पा गुरव व संजीव रामचंद्र पाटील, यांच्या उपस्थितीत पार पडली. या बैठकीत मागील आठवड्यात झालेल्या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या सर्वसाधारण बैठकीत झालेल्या चर्चेला अनुसरून खानापूर तालुका मराठी एकीकरण समितीची नवीन कार्यकारणी घोषित करण्यात आली आहे.
तालुका म. ए समिती अध्यक्षपदी श्री गोपाळराव बळवंतराव देसाई यांना अध्यक्षपदी कायम ठेवण्यात आले आहे. तर कार्याध्यक्षपदी श्री मुरलीधर गणपतराव पाटील, श्री निरंजन उदयसिंह सरदेसाई यांची निवड करण्यात आली आहे. तर सरचिटणीसपदी श्री आबासाहेब दळवी, सहचिटणीस पदी श्री रणजीत पाटील खजिनदारपदी संजीव पाटील, उपखजिनदार पदी पांडुरंग तुकाराम सावंत यांची निवड करण्यात आली आहे. तर उपाध्यक्ष म्हणून जांबोटी भागातून जयराम देसाई, गर्लगुजी भागातून कृष्णा कुंभार, खानापूर शहरातून मारुती देवाप्पा गुरव, नंदगड भागातून रमेश धबाले व लोंढा भागातून कृष्णा मनोळकर यांची निवड करण्यात आली आहे.