हलगा : खानापूर तालुक्यातील विविध माध्यमिक विद्यालयात आपली 38 वर्षाची शैक्षणिक सेवा बजावून गेल्या 30 जून रोजी सेवानिवृत्त झालेल्या हालगा वनश्री हायस्कूल चे लिपिक तुकाराम जळगेकर यांचा सेवानिवृत्ती पर सदिच्छा सोहळा नुकताच पार पडला.
श्रीयुत तुकाराम जळगेकर हे एक प्रामाणिक लिपिक म्हणून परिचित होते दक्षिण महाराज शिक्षण मंडळाच्या सापगाव हलगा व गोधोळी या ठिकाणी 38 वर्षे त्यांनी आपली सेवा बजावली आहे. त्यांच्या सेवानिवृत्ती निमित्त आयोजित कार्यक्रमात द. म. शि. मं. चे. संचालक एस्. डी. पाटील, ज्ञानवर्धिनी प्रतिष्ठान खानापूरचे अध्यक्ष पीटर डिसोझा, कर्नाटक राज्य माध्यमिक शाळा संघटनेचे जनरल सेक्रेटरी सलिम कित्तूर, शाळा सुधारणा समितीचे सदस्य डी. एम्. गुरव, एम्. जी. पाटील, नाना पाटील, मारूती पाटील, नागेशी फटाण, अशोक गुरव, महाबळेश्वर पाटील, निवृत प्राचार्य पी. के. चापगावकर, निवृत मुख्याध्यापक एम्. एम्. पाटील, मुख्याध्यापक व्ही. बी. होसूर तसेच सत्कारमूर्ती तुकाराम जळगेकर व त्यांच्या पत्नी सौ. रेश्मा जळगेकर व्यासपीठावर उपस्थित होते. श्री विठ्ठल गुरव हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.
सुरवातीला इयत्ता दहावीच्या विद्यार्थीनीनी स्वागत गीत आणि ईशस्तवन सादर केल्यानंतर उपस्थितांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. मुख्याध्यापक टी. वाय. भोगण यांनी उपस्थितांचे स्वागत आणि कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. विविध शाळांतून आणि भागांतून आलेल्या अनेक मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, मित्रपरिवार, आजी-माजी विद्यार्थी, नातेवाईक, जळगेकर परिवार तसेच गोधोळी, चापगाव व हलगा गावातील मंडळींकडून श्री तुकाराम जळगेकर यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. व्यासपीठावरील मान्यवरांनी श्री तुकाराम जळगेकर यांच्या सह्याद्री हायस्कूल गोधोळी, मलप्रभा हायस्कूल चापगाव आणि वनश्री हायस्कूल हलगा या शाळांमधून बजावलेल्या ३८ वर्षाच्या कार्याचा आढावा मांडताना त्यांच्या प्रामाणिक सेवेबद्दल कौतुक केले. यानिमित्ताने ज्ञानवर्धिनी प्रतिष्ठानच्यावतीने विवेक वेलणकर लिखित “दहावी आणि बारावीनंतरची शाखानिवड” हे पुस्तक सर्व शाळांना भेट देण्यात आले. विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वाटचाल करण्यास हे पुस्तक नक्कीच मदत करील.
एस्. एन्. पाटील यांनी कार्यक्रमाचे सुत्रसंचलन केले तर दीपा बडसकर यांनी आभारप्रदर्शन केले. ए. एस्. पाटील, जी. एन्. नाकाडी व जी. सी. पाटील यांनीही कार्यक्रमाच्या आयोजनात मोलाचा हातभार लावला.