माडीगुंजी: येथील सरकारी प्राथमिक मराठी शाळेमध्ये माडीगुंजी येथील श्रीराम सेना हिंदुस्तान तसेच बेळगाव महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या वतीने शैक्षणिक साहित्याचे वाटप अभियान राबवण्यात आले. शाळेतील प्रत्येक मुलांना वह्या व पेन्सिल देऊन प्रोत्साहित करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र एकीकरण समितीचे युवा कार्यकर्ते तसेच माडीगुंजी श्रीराम सेना हिंदुस्तान चे अध्यक्ष पंकज कुट्रे, पंकज सावंत, संतोष पाटील, संजय बांदोडकर आधी उपस्थित होते. यावेळी हा उपक्रम राबवल्याबद्दल शाळा सुधारणा समितीचे अध्यक्ष तानाजी गोरल, सतीश बुरुड यांनी त्यांचे अभिनंदन केले.