शिंदोळी: खानापूर तालुक्यातील शिदोळी प्राथमिक कृषी पतीन सहकारी संघाची चुरशीची निवडणूक नुकताच पार पडली. त्यानंतर संचालक मंडळाची पहिली बैठक सोमवारी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक व माजी आमदार अरविंद पाटील यांच्या उपस्थितीमध्ये पार पडली. यावेळी आगामी कालावधीसाठी चेअरमन पदी प्रदीप शिवाजी घाडी यांची एकमताने निवड करण्यात आली. तर व्हाईस चेअरमनपदी यशवंत शिवठणकर यांची निवड करण्यात आली आहे. यावेळी संचालक मोनेश्री झुंजवाडकर, रवळू मयेकर, कृष्णा मनोलकर, लक्ष्मी पाटील, पार्वती गावडा, पुंडलिक सुतार, पुंडलिक कुट्ट्रे, महादेव गावडा, नागेंद्र मादार आदि संचालक मंडळ उपस्थित होते. यावेळी माजी आमदार व जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक यांनी अध्यक्ष उपाध्यक्षांना मालारपण करून त्यांचे अभिनंदन केले. यावेळी अध्यक्ष उपाध्यक्षांनी बोलतांन संचालक मंडळानी व सभासदांनी दिलेल्या विश्वासाला पात्र राहून संस्थेच्या प्रगतीसाठी आपण प्रयत्न करू असे त्यांनी यावेळी सांगितले. त्यांच्या निवडीबद्दल कृषिपतीन सहकारी संघाच्या क्षेत्रातून अभिनंदन होत आहे.