बेकवाड : बेकवाड प्राथमिक कृषी पतीन सहकारी संघाची पंचवार्षिक निवडणूक रविवारी पार पडली. यामध्ये सामान्य गटाकरिता चुरशीची निवडणूक झाली. यामध्ये कृष्णाजी वसंत पाटील, जनकापा भरमाना बाळेकुंद्री, मनोहर रामचंद्र पाटील हे माजी आमदार अरविंद पाटील यांच्या शेतकरी विकास पॅनल मधून निवडून आले. तर याच गटात विरोधी बसलेले राजेंद्र कब्बूर यांची निवड झाली आहे. विशेष म्हणजे शेतकरी विकास पॅनलच्या विरोधी गटातील राजेंद्र कब्बूर व महादेव पाटील या विरोधी गटातील दोघाही उमेदवारांना समसमान मतदान झाले. त्यामुळे दोघांच्या चिठ्ठीद्वारे निवड करण्यात आली. यामध्ये राजेंद्र कब्बूर यांनी पुन्हा बाजी मारली आहे.
तर महिला गटात सुमन नामदेव गुरव, श्रीमंती नागोजी केसरकर, गुंडू बाळू सुतार (अ-वर्ग), मंजुनाथ पुंडलिक पाटील (ब वर्ग), गुरुप्रसाद यल्लाप्पा कोलकार (एस. सी), सुहास विजय पाटील (बिन कर्जदार) गटातून निवडून आले आहेत. उभयतांचे माजी आमदार अरविंद पाटील यांनी अभिनंदन केले आहे निकाल लागल्यानंतर नंदगड दक्षिण कृषी पतींचे अध्यक्ष पी. एच. पाटील यांनी उभयतांचे अभिनंदन केले.