खानापुर: गणेबैल टोलवसुली प्लाझाचे काम बऱ्याच दिवसांपूर्वी पूर्ण झाले आहे. पण आता 11 जुलैपासून टोलवसुली सुरू करण्याचा निर्णय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने घेतला आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने याबाबत अधिसूचना जाहीर केली आहे.
बेळगांव-खानापूर या 30 किलोमीटर लांबीच्या रस्त्याचे काम सुरू आहे. यापैकी केवळ 16.34 किलोमीटर रस्त्याचे काम पूर्ण होऊन वाहतुकीस खुला झाला आहे. त्यामुळे टोल वसुलीचा दर या अंतराच्या मार्गापुरताच निश्चित केला आहे. 31 मार्च 2024 पर्यंत हे दर लागू असतील. सर्व वाहनांच्या प्रवासासाठी चोवीस तासाच्या आत परतीचा प्रवास केल्यास 25 टक्के सवलत आहे. तसेच एका महिन्यात 50 वेळा प्रवास केल्यास 33 टक्के सूट आहे. टोल प्लाझा असलेल्या जिल्ह्यात नोंदणी असलेल्या वाणिज्य वाहनांना (राष्ट्रीय परवाना वगळता) 50 टक्के सूट आहे.
स्थानिक वाहनधारकांना 330 रुपयांचा पास
गणेबैल टोल प्लाजाच्या परिसरातील वाहनधारकांना टोलमधून सवलत द्यावी, अशी स्थानिक नागरिकांची मागणी होती. पण राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने त्यांना मासिक पासचा पर्याय दिला आहे. टोल प्लाजापासून 20 किलोमीटरच्या परिघात असलेल्या बिगर वाणिज्यक वाहनांना 2023- 24 सालासाठी मासिक 330 रुपयांचा पास देण्यात येणार आहे.
गणेबेल टोलप्लाजावरील निर्धारित दर (रुपयात) वाहन प्रकार एकेरी, दुहेरी, मासिक जिल्ह्यात वाहतूक वाहतूक 50 हून नोंदणी अधिक असलेले फेरी वाहन कार, जीप, व्हॅन, लाईट मोटर यांना एकेरी वाहतुसाठी 30 रुपये तर दुहेरी वाहतुकीसाठी 45 रुपये मिनी बस, लाहान मालवाहू वाहन एकेरी वाहतुकीसाठी 45 रुपये दुहेरी वाहतुकीसाठी 70 रुपये , बस, ट्रक (2 एक्सेल) एकेरी वाहतुकीसाठी 95 दुहेरी वाहतुकीसाठी 140 रुपये , मालवाहू वाहन (3 एक्सेल) एकेरी वातीसाठी 105 दुहेरी वाहतुकीसाठी 160 रूपये, अवजड बांधकाम मशीन वाहन, एकेरी वाहतुकीसाठी 150 रुपये दुहेरी वाहतुकीसाठी 225 रुपये , अर्थ मुव्हींग, मल्टी एक्सेल (4 ते 6 एक्सेल) एकेरी वाहतुकीसाठी 150 रुपये दुहेरी वाहतुकीसाठी 225 रुपये तर 7 हून अधिक एक्सेल अवजड वाहने एकेरी वाहतुकीसाठी 185 रुपये दुहेरी वाहतुकीसाठी 275 रुपये असे दर निश्चित करण्यात आले आहेत.