खानापूर: निटूर प्राथमिक कृषी पतील सहकारी संघाची पंचवार्षिक निवडणूक नुकताच पार पडली . निवडून आलेल्या संचालक मंडळाची पहिली सभा माजी आमदार व जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक अरविंद पाटील यांच्या उपस्थित पार पडली यामध्ये आगामी काळासाठी चेअरमन म्हणून संस्थेचे विद्यमान चेअरमन व भाजप नेते राज्यवन निगमचे माजी संचालक सुरेशराव नारायणराव देसाई यांची एकमताने निवड करण्यात आली तर उपाध्यक्षपदी रामचंद्र महादेव मोरे यांची निवड करण्यात आली. या निवडी बद्दल उभयतांचे अभिनंदन करण्यात आले.
या संस्थेच्या संचालक मंडळामध्ये मनोहर मारुती बरूकर,नामदेव कल्लाप्पा सुळेभावीकर, अशोक विठ्ठल देसाई, सविता यल्लाप्पा गुरव, गंगुबाई गावडू चौगुले, बाळाप्पा रामचंद्र पाटील, रुद्रप्पा भिमाप्पा कोणेरी, नागेश यशवंत मादार, लक्ष्मण बाळाप्पा नाईक, संध्या सागर नार्वेकर यांची संचालक म्हणून निवड झाली आहे. आज झालेल्या या निवडणुकीत निवडणूक अधिकारी म्हणून चेतन हंजी यांनी काम पाहिले. उभयतांच्या निवडीबद्दल माजी आमदार अरविंद पाटील यांनी उभयतांचे पुष्पहार घालून स्वागत केले. व संस्थेच्या बिनविरोध निवडू साठी सहकार केलेल्या माजी आमदार व जिल्हा बँकेचे संचालक अरविंद पाटील यांचा यावेळी सन्मान करण्यात आला.