Screenshot_20230705_215906

नंदगड : शालेय जीवन हे आनंदी व उत्साही असते शिक्षणाबरोबर सामाजिक तसेच राजकीय ज्ञानही या क्षेत्रात मिळते लोकशाही हा देशाचा मुख्य घटक असून लोकशाहीच्या तक्तावर चालणारे मंत्रिमंडळ व त्याची नियुक्ती याचा अभ्यासही आजच्या विद्यार्थ्यांना होणे काळाची गरज आहे म्हणून शाळेतील शैक्षणिक गुणवत्तेबरोबर शाळांमध्ये शैक्षणिक मंत्रिमंडळाची निर्मिती करून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणे हा एक महत्त्वाचा भाग असून अशा उपक्रमांना प्रोत्साहन देणे गरजेचे असल्याचे विचार घोटगाळी पीकेपीएस चे अध्यक्ष डॉ. रफीक हलशीकर यांनी व्यक्त केले.

नंदगड येथील ऑक्झिलियम कॉन्व्हेंट इंग्लिश मीडियम हायस्कूल मध्ये 2023-24 या शैक्षणिक वर्षातील शालेय मंत्रिमंडळ निवडणूक कार्यक्रम पार पडला. यावेळी ते बोलत होते.

प्रारंभी शाळेच्या मुख्याध्यापक श्री. ज्योती पिंटो यांनी उपस्थित यांचे स्वागत करून शालेय मंत्रिमंडळाची रचना लोकशाहीतील एक अनुभवाचा भाग असून विद्यार्थ्यांना ते समजावून देण्यासाठीच हा उपक्रम असल्याचे त्यांनी विचार मांडले. शाळेच्या वतीने उपस्थित मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. मॅनेजर सीनियर लता आरोगिया चार विभागात मंत्रिमंडळाची रचना कशी असते याची माहिती दिली. व विद्यार्थी वर्गातून शालेय मंत्रिमंडळ नियुक्त करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून सुभानी यल्लूर यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. व विद्यार्थी प्रतिनिधींचे अभिनंदन करण्यात आले.
शाळेचे प्रमुख पुढीलप्रमाणे आहेत.
विद्यार्थीनी प्रतिनिधी पदी तेहारीन हंडूर , विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून स्वप्नील वड्डर यांची निवड करण्यात आली. क्रीडा प्रतिनिधी म्हणून कार्तिक जोडंगी सहाय्यक कॅप्टन- अफसीन चंदगडकर, ब्लू हाऊसचा कॅप्टन – फुरखान पठाण, सहाय्यक कॅप्टन – श्रेया नाईक, ग्रीन हाऊसची कॅप्टन – वैष्णवी सकीन, सहाय्यक कॅप्टन – जोतिबा कोळेकर ,रेड हाऊसचा कॅप्टन – प्रज्वल दोडवाड, सहाय्यक कॅप्टन- समृद्धी भुशी ,यलो हाऊसची कॅप्टन – परवीना वनराशी ,सहाय्यक कॅप्टन- निखिल दादगळकर, प्रीफेक्ट्स: नर्सरी प्रतिनिधी : नजमीन सनदी, Lkg: रूपा प्रसाद , Ukg: मुशाफिक जमादार, पहिली
मध्ये प्रतिनिधी म्हणून गिरिजा पाटील, दुसरी मध्ये अमर देसुरकर, 3 री मध्ये सानिका बेटगेरी, 4थी मध्ये महालक्ष्मी कल्याणी, 5 वीमध्ये राजलक्ष्मी देसाई, 6 वीमध्ये प्राची चव्हाण, 7वी मध्ये माझ बसरीकट्टी,
8वी मध्ये विनायक करविनकोप, 9 वीमध्ये दिव्या सुतार तर दहावी मध्ये कैफ बेपारी यांची निवड करण्यात आली आहे .

Do Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Us