खानापुर: आधुनिक शिक्षण पद्धतीत अमलाग्र सुधारणा होत असल्या तरी जीवनात शिक्षणाला अधिक महत्त्व आहे अलीकडच्या काळात मुलांच्या पेक्षा मुलींच्या शिक्षणाची सरशी वाढली आहे. आम्ही सावित्रीच्या लेकी या उक्तीप्रमाणे आज मुली प्रत्येक क्षेत्रात पुढे जाताना दिसतात त्यामुळे या देशाच्या उज्वल भविष्यासाठी असेच गुणात्मक शिक्षण प्रत्येक विद्यार्थ्यांनी आत्मसात करावे व तालुक्याचे नाव उज्वल करावे असे विचार लिहायला साखर कारखान्याचे महाव्यवस्थापक व भाजप युवा नेते सदानंद पाटील यांनी व्यक्त केले.
आज मराठी भाषा प्रेरणा मंच वतीने खानापूर मधील ताराराणी हायस्कूल मध्ये शैक्षणिक प्राविण्य पुरस्कार” गौरवपूर्वक कार्यक्रम पार पडला. यावेळी ते प्रमुख अतिथी या नात्याने बोलत होते.
यावेळी तालुक्यामध्ये 2023 च्या दहावीच्या उत्तीर्ण क्रमांक पटकावलेल्या विद्यार्थ्यांचे स्वागत व सत्कार करण्यात आले. व तसेच तालुक्यातील 100% टक्के निकाल लागलेल्या शाळांच्या मुख्याध्यापकांचा सत्कार करण्यात आला. यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून मराठी प्रेरणा मंचचे अध्यक्ष आणि आयआयटी मुंबईचे प्राध्यापक डॉ. गोपाळ पाटील, समिती युवा नेते निरंजनसिंह सरदेसाई, पुढारीचे पत्रकार वासुदेव चौगुले आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ताराराणी हायस्कूलचे मुख्याध्यापक राहुल जाधव होते. सहशिक्षक लक्ष्मण पाटील यांनी सूत्रसंचालन केले. आर के पाटील यांनी उपस्थितांचे स्वागत केले. यावेळी मराठी प्रेरणा मंचचे सदस्य डी. बी. पाटील, सचिव अरुण कदम, शिवाजी हसनेकर, अशोक चौगुले, ताराराणीचे शिक्षक संजीव वाटुपकर, कणकुंबी माऊली विद्यालयाचे मुख्याध्यापक सुनील चिगुळकर व तसेच तसेच तालुक्यातील शिक्षक वर्ग, व उत्तीर्ण क्रमांक पटकावलेल्या विद्यार्थ्यांचे पालक व ताराराणी हायस्कूल च्या विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या.