IMG-20230703-WA0156

खानापूर : घोटगाळी कृषी पत्तीन सहकारी संघाच्या अध्यक्षपदी रफिक  हालशिकर तर उपाध्यक्षपदी यल्लाप्पा परशराम कोलकार यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.

कृषीपतीन सहकारी संघाच्या निवडणुकीत  माजी आमदार अरविंद पाटील यांच्या  उपस्थितीत सर्व संचालक मंडळाची बैठक होऊन डॉ रफिक नजीरसाब हलशीकर यांची सर्वानुमते अध्यक्ष पदी, तर यल्लाप्पा परशराम कोलकार यांची उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली. संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत माजी आम्. अरविंद पाटील यांच्या समर्थक पॅनलचे  श्याम गोपाळ आपटेकर, महादेव गोपाळ मिराशी, महाळाप्पा लखमाणा पठाण, सातेरी यशवंत वीर, पार्वती शंकर पाटील, श्रीमती सुहासिनी बाळकृष्ण देसाई, अकबर इमामसाब इनामदार, मष्णु दत्तू पाटील, यल्लाप्पा कोलकार, बसवानी गुड्डाप्पा तिळमिळकर, सहदेव परशराम चौरी, रफिक नजीरसाब हलशीकर  निवडून आले होते. आज नूतन संचालक मंडळांची पहिली बैठक झाली यामध्ये उभयतांची  बिनविरोध निवड करण्यात आली. माजी आमदार अरविंद पाटील यांचे आभार मानले असून त्यांच्या सहकाऱ्यांनेच हे पॅनल निवडून आले आहे. यावेळी बोलताना नूतन अध्यक्ष डॉ. रफीक  यांनी जनतेने तसेच संस्थेच्या सभासदांनी दिलेल्या विश्वासाला पात्र राहून आपण काम करू तसेच माजी आमदार अरविंद पाटील यांची प्रेरणा व सहकारी घेऊन संस्थेच्या प्रगतीसाठी कायम प्रयत्नशील राहील अशी ग्वाही रफिकर यांनी दिली.

Do Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Us