खानापूर-प्रतिनिधी
खानापूर तालुका गट शिक्षणाधिकारी म्हणून नव्याने नियुक्त झालेले वाय जे बजंत्री यांनी आज दि. 3 रोजी गट शिक्षणाधिकारी पदाचा पदभार स्वीकारला आहे. यावेळी खानापूर गट शिक्षणाधिकारी कार्यालयाच्या वतीने त्यांचे पुष्पहार घालून स्वागत करण्यात आले. शिवाय खानापूर तालुक्यातील बहुतांश शिक्षकांनीही यावेळी उपस्थित राहून नूतन गट शिक्षणाधिकाऱ्यांचे स्वागत करून त्यांचे अभिनंदन केले.
गटशिक्षणाधिकारी बजंत्री हे यापूर्वी बेळगाव येथे शिक्षणाधिकारी म्हणून होते ते एक कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून ओळखले जातात.