बैलूर ; दि बैलूर प्राथमिक कृषी सहकारी संघ नियमित तीर्थकुंडये या संस्थेची पंचवार्षिक निवडणूक नुकताच बिनविरोध झाली. या संस्थेच्या नूतन संचालक मंडळाची बैठक सोमवारी पार पडली. या बैठकीत नूतन अध्यक्षपदी दामोदर मारुती नाकाडी यांची आगामी कालावधीसाठी अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे. तर संस्थेच्या उपाध्यक्षपदी गणपती भ. सावंत यांची निवड झाली आहे.
सदर बैलूर प्राथमिक कृषीपतीन संघाची वाटचाल माजी आमदार व जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक अरविंद पाटील यांच्या नेतृत्वाखाली या संस्थेची भरभराट सुरू आहे. त्या अनुषंगाने या पंचवार्षिक निवडणुकीत माजी आमदार अरविंद पाटील यांनी महत्त्वाची भूमिका बजावून सर्व सभासदांना संस्थेचे हित पटवून दिले. व संस्थेच्या नूतन संचालक मंडळाची बिनविरोध निवड करण्यात आली. या संस्थेच्या संचालकामध्ये रामचंद्र नागप्पा नाकाडी, नामदेव नाकाडी, कृष्णकांत का.बिर्जे विठ्ठल क. गुरव. विठ्ठल व. बोंजूरडेकर, विठ्ठल कांबळे, रामू गुरव, भैरू किनेकर, सौ. जनाबाई राजगोळकर सौ. सुमन गोवेकर यांचा समावेश आहे. निवडणूक बिनविरोध करण्यासाठी लक्ष्मण झांजरे, पुंडलिक नाकाडी, मंगेश गुरव, धर्माजी गुरव, सातेरी चोपडे, मारुती हलगेकर, पांडुरंग गावडे राहुल गुरव, लक्ष्मण गोवेकर, सह अनेकांचे मार्गदर्शन लाभले. उभयतांची निवड झाल्याबद्दल त्यांचे श्रीफळ शाल देऊन अभिनंदन करण्यात आले.