घोटगाळी: घोटगाळी ग्रामपंचायत मध्ये नरेगा योजनेअंतर्गत राबवण्यात आलेल्या विकास कामासंदर्भात केलेल्या तक्रारीवरून ग्रामपंचायत सदस्यांचे सदस्यत्व रद्द अशा आशयाची प्रसिद्ध झालेली बातमी ही निकालास खोटी असून तसा कोणताच आदेश अथवा कारवाई झाली नाही. सदर बातमी जनतेची दिशाभूल करणारे असून या बातमीवर कोणीही विश्वास ठेवू नये असा खुलासा घोटगाळी ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य डॉ. रफिक हलसीकर यांनी खानापूर लाईव्ह सी बोलताना दिला. वृत्तासंदर्भात बोलताना ते म्हणाले, मनरेगा चे वरिष्ठ लोकपाल यानी दिलेल्या चौकशी अहवालात ग्रामपंचायत सदस्यांचे सदस्यत्व रद्द करण्यात यावे असा कोणताच उल्लेख केला नाही. पण काही वृत्तपत्र व सोशल मीडियामध्ये रफिक हलशीकर यांचे सदस्यत्व रद्द अशी प्रसिद्ध झालेली बातमी ही निकालास खोटी असल्याचे हलाशिकर यानी आलेल्या आदेश पत्रावरून निदर्शनाला आणून दिले .
घोटगाळी ग्रामपंचायत मध्ये 2021 मध्ये नरेगा योजनेअंतर्गत एका सिसी रस्त्याचे काम हाती घेण्यात आले होते. सदर काम पूर्णही झाले होते. पण काही तांत्रिक अडचणीमुळे या कामात व्यत्ययही आला. जाणीवपूर्वक या कामात ग्रामपंचायतीवर आरोप पत्र करून संबंधित कामाच्या वार्डातील सदस्यांना जबाबदार धरून राजीनाम्याची मागणी करून रोहयोचे लोकपाल यांच्याकडे तक्रार केली होती. लोकपालानी प्रत्यक्ष पाहणी करून ग्रामपंचायतीला सन्मन्स दिले होते. या संदर्भात ग्रामपंचायतीने खुलासाही केला आहे. पण पुन्हा पुन्हा तक्रार दाखल झाल्याने ग्रामपंचायतीच्या तात्कालीन व विद्यमान समितीच्या विरोधात लोकपालानी आदेश दिले आहेत. हे जरी खरे असले तरी या लोकपालांच्या आदेशात तसा सदस्यत्व रद्द करण्यासंदर्भात कोणताच आदेश नाही. मात्र याबाबत खर्ची घालण्यात आलेली 03 लाख 88 हजार रुपयाची रक्कम संबंधित कमिटी व पिडीओ व विद्यमान अध्यक्ष, व सदस्यांकडून भरणा करून घ्यावी असे आदेश ता.प कार्यकारी अधिकाऱ्यांना दिले आहेत. हे जरी खरे असले तरी सदस्यत्व रद्द असे प्रसिद्ध झालेले वृत्त साफ चुकीचे असून यामध्ये कोणतेच तथ्य नाही. तसेच या आदेशात ग्रामपंचायतीची बाजू न ऐकता एकतर्फी निकाल दिला आहे, यावर कोणीही विश्वास ठेवू नये असे त्यांनी आपल्या खुलाशात नमूद केले आहे.