बरगाव ; खानापूर तालुक्यातील बरगाव प्राथमिक कृषी पतीन सहकारी संघाची पंचवार्षिक निवडणूक नुकताच बिनविरोध पार पडली. विशेष म्हणजे या संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीत सत्ताधारी संचालकांच्या विरोधात एकही अर्ज दाखल झाला नाही.त्यामुळे या संचालक मंडळावर सभासदांनी दिलेली विश्वासार्थता हीच फार महत्त्वाची असून असेच सहकार्य खानापूर तालुक्यातील अन्य कृषी पतीन सहकारी संघाच्या सभासदांनी केल्यास सहकार क्षेत्र नक्कीच उंचावेल. असे विचार जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक माजी आमदार अरविंद यांनी व्यक्त केले.
या संस्थेच्या नूतन संचालकांची पहिली बैठक सोमवारी पार पडली. या बैठकीत विद्यमान अध्यक्ष कल्लाप्पा मुकुंद पाटील यांची चेअरमन पदी फेरनिवड करण्यात आली. कल्लाप्पा पाटील हे सलग चौथ्यांदा या संस्थेवर अध्यक्ष बिनविरोध निवडून आले आहेत. तर उपाध्यक्षपदी ज्येष्ठ संचालक राजू वासुदेव कदम यांची निवड करण्यात आली. उभयतांचे माजी आमदार व जिल्हा बँकेचे संचालक अरविंद पाटील यांनी श्रीफळ शाल घालून अभिनंदन केले.
संचालक विश्वास शिवाजी पाटील-निडगल, सय्यद इमामसाब धामणेकर बरगांव , महादेव परशराम कदम निडगल, अरुण मनोहर पाटील, भंडरगाळी, नागेश नु. सुतार बरगाव, डॉ निंगो खमाण्णा कांबळे बरगांव, सौ. सुनंदा भाऊराव पाटील भंडरगाळी, सौ. प्रियांका प्रकाश पाटील कुप्पटगिरी, सौ मलप्रभा मोहन पाटील बरगाव यांची बिनविरोध निवड झाली आहे. यावेळी उभय त्यांचे अभिनंदन करण्यात आले.