खानापूर /प्रतिनिधी: कर्नाटकातील ग्रामपंचायतींच्या पहिल्या 30 महिन्यातील ग्रामपंचायतींचा कालावधी येत्या 31 जुलै 2023 ते 04 ऑगस्ट 2023 या कालावधीत संपणार आहे. त्यामुळे नुकताच आरक्षण झालेल्या अध्यक्ष उपाध्यक्ष यांची निवडणूक प्रक्रिया लवकरच हाती घेण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने आठवड्याभरापूर्वी ग्रामपंचायतीच्या अध्यक्ष -उपाध्यक्ष पदाच्या आगामी 30 महिन्याच्या कालावधीसाठी आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे कधी निवडणूक प्रक्रिया होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार खानापूर तालुक्यातील ग्रा. प. अध्यक्ष उपाध्यक्षांची निवडणूक प्रक्रिया हाती घेण्यासाठी खानापूर तालुक्यातील 51 ग्रामपंचायतीकरिता निवडणूक अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सदर नियुक्त निवडणूक अधिकारी आगामी पंधरा दिवसांमध्ये संबंधित ग्रामपंचायतीचे वेळापत्रक जाहीर करणार आहेत. याकडे आता संपूर्ण खानापूर तालुक्याचे लक्ष लागले आहे.
खानापूर तालुक्यातील 51 ग्रामपंचायतीचा पहिल्या 30 महिन्यातील कालावधीला 01 फेब्रुवारी 2021 ते 04 फेब्रुवारी 2021 या कालावधीत पहिल्या बैठका घेऊन अधिकार ग्रहण करण्यात आले होते. त्या अधिकारांचा 30 महिन्याचा कालावधी येत्या 31 जुलै 2023 ते 04 ऑगस्ट 2023 रोजी संपणार आहे. त्यामुळे आगामी 30 महिन्यासाठी तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत वर अध्यक्ष उपाध्यक्ष यांची निवड करून अधिकार ग्रहण करावे लागणार आहेत. यामुळे आता ही निवडणूक प्रक्रिया आगामी पंधरावड्यात पूर्ण होणार आहे. यापैकी 31 जुलै रोजी कार्यकाळ संपणाऱ्या ग्रामपंचायत मध्ये हलशी, बैलूर, गोल्याळी, नागुर्डा, या ग्रामपंचायतीचा समावेश आहे. तर 01 ऑगस्ट रोजी कसबा नंदगड, शिंदोळी , नेरसे, गुंजी, शिरोली, जांबोटी, निटूर, इदलहोंड, आमटे, निलावडे, पारिस्वाड, हिरेमुनोळी, कक्केरी, भुरूनकी, लिंगनमठ. दि.02 रोजी हेबाळ, बरगाव, तोपिनकट्टी, गोधोळी, हलगा, करंबळ, रामगुरवाडी, कणकुंबी, लोंडा, बिडी, नंजीनकोडल, मोहिशेत, गंदीगवाड, इटगी, कोडचवाड. दि. 03 ऑगस्ट रोजी नंदगड, चापगाव, लोकोळी, बिजगरणी , कापोली के.जी, नागरगाळी, पारवाड, घोटगाळी, हिरेहट्टीहोळी, क. बागेवाडी, मंग्यांनकोप, केरवाड, मनतूर्गा, तर दि. 04 ऑगस्ट रोजी देवलती, हलकर्णी, बेकवाड, या ग्रामपंचायतींचा समावेश आहे. त्यामुळे या निर्धारित तारखे नंतरच नवनिर्वाचित ग्रामपंचायत अध्यक्ष उपाध्यक्षांना अधिकार दिला जाणार आहे. त्यामुळे आता निवडणूक प्रक्रिया राबवण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांच्या वेळापत्रकाकडे खानापूर तालुक्यातील ग्रामपंचायत सदस्यांचे लक्ष लागले आहे.
ग्राम पंचायत निहाय नियुक्त करण्यात आलेले तालुकास्तरीय अधिकारी