खानापूर / प्रतिनिधी : खानापूर शहरांतर्गत जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरील पडलेले खड्डे बुजवण्याची थूकपॉलिसी कालच प्रशासनाने केली. पण मोठ्या पावसात पुन्हा तेरे माझ्या मागल्या! ही गेल्या तीन-चार वर्षातील अनुभूती काही चुकणार नाही. अशातच शहरांतर्गत जाणाऱ्या मलप्रभा नदीवरील पुलावर थोडाफार पाऊस पडला की पाणी साचण्याचे प्रकार घडतात, त्यामुळे शाळकरी मुलासह पादचाऱ्यांना मात्र याचा चांगलाच त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे या नवीन पुलावरून ये, जा करणाऱ्या वाहनधारकांना अरेभाई, जरा धीरे से चलो! म्हणण्याची वेळ शाळकरी मुलांच्यावर तसेच पादचाऱ्यांच्यावर आली आहे. असाच प्रकार शुक्रवारी दिसून आला. खानापुरात पावसाची बारीक रिमझिम सुरू आहे अशातच खानापूरच्या नवीन पुलावर पाणी निकामी होत नसल्याने साचले. त्यामुळे ुसाट येणाऱ्या पाण्याच्या चिंगार्या उडत आहेत. रुमेवाडी भागातील अनेक शाळकरी मुले या पुलावरून चालत ये,जा करतात अशावेळी पादचारी शाळकरी मुलींना अरे भाई, जरा धीरे से चलो असे सांगण्याची वेळ आली.
या पुलावर साचत असलेले पाणी कायमस्वरूपी निकामी करण्यासाठी गेल्या सात आठ वर्षात कधीही विशेष प्रयत्न हाती घेण्यात आले नाहीत. खानापूर शहरांतर्गत जाणाऱ्या या नवीन पुलाची निर्मिती 1970 च्या कालावधीत झाली आहे.पूर्वीच्या 14 मुसीकडील जुन्या पुलावरून ये-जाणारा पूर्वीचा राष्ट्रीय महामार्ग खानापूरला जोडणारा असायचा.पण जेव्हा शहरांतर्गत जाणारा बायपास रस्ता निर्माण झाल्यानंतर या नवीन पूलाची निर्मिती करण्यात आली.आता पुन्हा तब्बल 50 वर्षानंतर खानापूर शहराला नवीन व चकचकीत बायपास रस्ता झाला आहे. त्यामुळे शहरातील वर्दळीवर काही अंशी फटका बसत असला तरी खानापूर ही शहरातील बाजारपेठ व शाळकरी मुलांच्यासाठी महत्त्वाचे असल्याने शहरांतर्गत जाणाऱ्या जुन्या राष्ट्रीय महामार्गाच्या दुरुस्तीची अत्यंत आवश्यकता आहे.
नवीन पूल म्हणजे एक जीवघेणा प्रकार आहे. या पूलाच्या दुतर्फा कटडा पूर्णतः तुटल्या आहेत. बांबूच्या आधारावर या कठड्यांना संरक्षण देण्यात आले आहे पण कुणी चुकून या पुलावरून डोकावून पाहिले तर त्याच्यावर आत्महत्येचा तर आरोप येणार नाही, अशी भयानक परिस्थिती निर्माण झाली आहे.