खानापूर /प्रतिनिधी : खानापूर तालुक्यातील घोटगाळी ग्रामपंचायत मध्ये महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत एका कामामध्ये मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याच्या तक्रारीनुसार संबंधित कामासाठी वापरलेला सरकारी निधी व त्यासाठी जबाबदार असलेल्या एका ग्रामपंचायत सदस्याचे सदस्यत्व रद्द करणे व आजी-माजी अध्यक्ष व ग्राम विकास अधिकाऱ्यांसह जबाबदार कर्मचाऱ्यांच्या कडून सदर रक्कम वसूल करण्याचे आदेश नरेगाचे उपसंचालक हवालदार यांनी एका आदेशाद्वारे केले आहे. अस संबंधित रक्कम वसूल करण्याचे आदेश तालुका पंचायत कार्य निर्वाहक अधिकाऱ्यांच्याकडे दिले आहेत. यामुळे ग्रामपंचायत क्षेत्रात एकच खळबळ निर्माण झाली आहे.
याबाबत मिळालेली माहिती की, घोटगाळी ग्रामपंचायत मध्ये ग्रामपंचायत देवराई- जांभेगाळी येथे एका नरेगाच्या कामासाठी जवळपास 3.88,890.50 रुपये चा निधी वापरून काम केले होते. परंतु सदर काम सुयोग्य व निष्कृष्ट दर्जाचे झाले होते, याशिवाय सदर काम एका ग्रामपंचायती सदस्याने करणे कायदाबाह्य असताना कोणत्याही प्रकारची निविदा अथवा कंत्राटदराला काम न देता स्वतःच काम केल्याचा आरोप इरफान तालीकोटी यांनी दि. 23 -11-2021 रोजी केली होती. या तक्रारीची दखल नरेगाचे उप संचालक डॉ डी. एस हवालदार यांनी करून चौकशी प्रारंभ केली होती. या चौकशीनुसार सदर कामात आढळलेल्या कायदेशीर बाबी व कामातील बेजबाबदारपणा याला जबाबदार असलेल्या सर्वांनाच नोटीसा बजावल्या होत्या. अखेर या कामाची दखल घेऊन सदस्यांनी कोणतीही निविदा न मागवता स्वतः काही कामगारांना घेऊन काम केल्याचे दिसून आले. शिवाय याला जबाबदार आजी माजी अध्यक्ष, तत्कालीन ग्रामपंचायत विकास अधिकारी व विद्यमान ग्रामपंचायत विकास अधिकारी, संगणक ऑपरेटर सह क्लार्क याला जबाबदार धरण्यात आले. व या सर्वांच्याकडून संबंधित 3,88890.50 रुपयाची रक्कम वसूल करण्याचे आदेशही बजावले आहेत. यासंबंधी संबंधितांना आपली बाजू मांडण्यासाठी लोकपालानी 30 दिवसाची मुदत दिली आहे.