बेळगांव: सध्या आषाढी एकादशीचे वेध सर्व वारकऱ्यासह विठू माऊलीच्या भक्तात लागले आहे. पंढरीच्या पांडुरंगाची आराधना करण्यासाठी वेगवेगळ्या स्वरूपात अनेक भक्तगण थेट घरापासून पंढरपूरच्या विठलाच्या पायरी पर्यंत जाऊन नतमस्तक होतात. अशा मध्येच एक बेळगाव येथील RK Chef कल्लाप्पा शिवाजी भातकांडे यांनी कलिंगड फळामध्ये श्री विठ्ठलाची मूर्ती साकारून श्री पांडुरंगाची आराधना केली आहे.