जांबोटी : बैलुर ( ता. खानापुर) ग्राम पंचायतमधील देवाचीहट्टी येथील पंचायतीच्या गावठाणमध्ये गैरव्यवहार झाला असून, मोजक्याच लोकांच्या नावे जागा नावावर लावून घेण्याचा प्रकार झाला आहे. याची चौकशी व्हावी म्हणुन दोन महिन्यापूर्वी गावकऱ्यांनी जि. पं. मुख्य आधीकरी, तालुका पंचायत मुख्य आधिकऱ्याना तसेच ग्राम पंचायत सुधारणा आधिकार यांना दोन महिन्यापूर्वी निवेदन दिले होते. विधानसभा निवडणुकीमुळे याला विलंब झाला होता. मात्र, पुन्हा गावकऱ्यांनी जि. पं. मुख्य आधीकारी हर्षल भोयर यांना निवेदन दिले असता, त्यांनी यांची तत्काळ दखल घेऊन तालुका पंचायत मुख्य आधिकर्याना तात्काळ यांची चौकशी करून अहवाल पाठविण्याचे आदेश दिले आहेत.सदर आदेशात, देवाचीहट्टी येथील पंचायतीच्या गावठाणवर कोणी आणि कसा कब्जा मिळवला आहे. यांची तपासणी करावी. सदर लोकांकडे कोणती कागदपत्रे आहेत, त्यांनी ती जागा खरेदी केली आहे,की, तत्कालीन पंचायत आधिकऱ्यनी गैरव्यवहार करून नोंद करुन घेतली आहे याची सखोल चौकशी करावी. त्यामध्ये तत्कालीन एका अध्यक्षाच्या नातेवाइकांच्या नावावरही जागा नोंद असून, ती जागा त्यांच्या कार्यकाळात नोंद आहे की, आधीची याचीही खातरजमा करा. त्यात जर कोणी दोषी आढळल्यास कारवाईचा बडगा उगारण्यात येईल असेही जि. प. मुख्य आधिकाऱ्यानी यात नमूद करण्यात आले आहे.
चौकशी समिती स्थापन
सदर गावठाण गैव्यवहाराची चौकशी करण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली असून, त्यांच्याकडून चौकशी सुरु असल्याची माहिती आधिकर्यानी दिली. या समितीत जि. प. व तालुका पंचायतीतील आधिकर्यांचा समावेश करण्यात आला आहे. जि. पं. मुख्य आधिकर्याना निवेदन देतेवेळी ग्रा. पं. सदस्य प्रदीप कवठंनकर, महादेव केरिकर, जयवंत कवठंनकर, रामचंद्र कवठणकर, विनोद धूरी, दुलाजी कुंभार, भोजू बामणे, संतोष कुंभार, महादेव गोवेकर, दीपक कुंभार, मालोजी कवठणकर, विष्णू कुंभार, सुहास कवठंनकर, लक्ष्मण कवठणकर, समीर कवठ्णकर, अंजय कवठंनकर, शिवाजी कवठंनकर विलास कवठंनकर आदी उपस्थित होते.