खानापूर : सततच्या आजारपणाला कंटाळून आपल्या राहत्या घरात ओढणीने गळफास घेऊन एका युवतीने आत्महत्या केल्याची घटना शिवाजीनगर खानापूर येथे घडली आहे. या घटनेत रोहिणी रामचंद्र चोपडे (वय 23) असे त्या दुर्दैवी युवतीचे नाव आहे. रविवारी दुपारच्या दरम्यान आई शेताकडे गेली होती. तर भाऊ कामावर गेला होता. घरी कोणीही नसल्याचे पाहून त्या युवतीने आपल्या घरात आत्महत्या केल्याचे तपासात आढळून आले आहे. सायंकाळी भाऊ कामावरून घरी आले असता गळफास घेतलेल्या अवस्थेत रोहिणीचा मृतदेह दिसून आला. आत्महत्या केल्याची घटना कळताच परिसरात एकच हळहळ निर्माण झाली. तातडीने ही बाब खानापूर पोलिसांना कळविण्यात आली. त्यानंतर शवविच्छेदनासाठी सदर युवतीचा मृतदेह खानापूर येथील शासकीय रुग्णालयात आणून शल्य विच्छेदन करून नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. या घटनेची खानापूर पोलिसात नोंद झाली असून पोलीस तपास करत आहेत. रोहिणी बी कॉम पर्यंत शिकली होती. खानापूर येथील एका मेडिकल शॉप मध्ये ती कामाला होती.