IMG_20230625_172731

सौंदत्ती: कर्नाटक राज्य सरकारच्या स्त्रीशक्ती योजनेअंतर्गत

सौंदत्ती (जि. बेळगाव) येथील यल्लमा डोंगरावरही शुक्रवारी किरकोळ कारणावरून केएसआरटीसी परिवहन बसचा वाहक आणि महिला प्रवासी यांच्यात किरकोळ कारणावरून फ्री स्टाईल हाणामारी झाली. वाहकाची कॉलर पकडून महिलेने त्याची धुलाई केल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

याबाबत घटनास्थळावरून प्राप्त माहितीनुसार, सौंदत्ती आगाराच्या बसवर वाहक म्हूणन ड्युटीवर असलेले बसवराज भद्रण्णवर यांनी महिला प्रवाशांना लवकर बसमध्ये चढा असे सांगितल्यावरून वाद सुरु झाला. त्यावेळी काही महिलांनी वाहकाला धरा आणि चांगले बदडून काढा अशी चिथावणी दिल्याने एका आडदांड महिलेने वाहकाची कॉलर पकडून थेट त्याला मारहाण करण्यास सुरुवात केली.

त्यानंतर बसमधील इतर महिला प्रवाशांनी वाहकाला किरकोळ मारहाण केली. अनेकांनी अनेकप्रकारे समजावून सांगितले तरी महिला त्याचे शर्ट सोडायला तयार नव्हती.

बाबत बसचे वाहक भद्रण्णवर म्हणाले, माझ्या २६ वर्षांच्या सेवेत पहिल्यांदाच असे घडले आहे. माझीही चूक नसताना विजयपूरच्या त्या महिला प्रवाशांनी मला मारहाण केली आहे असे त्याने सांगितले. दरम्यान, जखमी वाहक भद्रण्णवर यांच्यावर सौंदत्ती आरोग्य केंद्रात उपचार करण्यात आले.

Do Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Us