खानापूर : तालुक्यातील लोंडा विभागाचे माजी जिल्हा पंचाय सदस्य धारवाडी यांच्या पाचही रत्नांनी आतापर्यंत डॉक्टर बनण्याचा मान मिळविला आहे. त्यांचे कनिष्ठ चिरंजीव अबूबकर धारवाडकर याने गेल्या मे 2023 मध्ये झालेल्या नीट( NEET)परीक्षेत तब्बल 21 लाख विद्यार्थ्यातून 1746 वा क्रमांक पटकावला आहे. त्याने 720 पैकी 680 गुण मिळवले आहेत. या त्याच्या यशाबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे.
मुगुडसाब धारवाडी हे खानापूर तालुक्यातील एक सामाजिक व्यक्तिमत्व व माजी जिल्हा पंचायत सदस्य म्हणून परिचित आहेत . त्यांच्या पोटी पाच रत्ने आहेत. या पाचही रत्नाने उल्लेखनीय काम करून डॉक्टर बनवण्याचा मान मिळवला आहे. त्यामुळे बेळगाव जिल्ह्यात मुकुट धारवाडी परिवाराने कमावलेला हा मोठा सन्मान आहे. या पाचही रत्नांनी कमावलेला हा ज्ञानाचा खजिना इतरांना आदर्श देणार आहे. खरंतर मुगुटसाब धारवाडी यांना त्यांच्या बालपणी प्रतिकूल परिस्थितीमुळे उच्च शिक्षण घेता आले नाही . पण पोटी जन्मलेल्या रत्नानी मात्र ती तूट भरून काढली आहे. मुगुटसाब धारवाडी यांची ज्येष्ठ कन्या रुखया हिने बीएचएमएस( BHMS) करून ती दिल्ली येथे यूपीएस कोचिंग करत आहे. तर द्वितीय कन्या आयेशा ही देखील बीएचएमएस करून स्वतः लोंढा गावामध्ये रुग्णांची सेवा बजावते. तर तृतीय कन्या बीबी. खुतेजा व चतुर्थ चिरंजीव मुस्तफा यांनी हिने 2021- 22 मध्ये झालेल्या नीट (NEET) परीक्षेत घवघवीत यश संपादन होतं. यापैकी बिबी खूतेजा हिने ज्या 720 पैकी 690 गुण घेऊन देशात 384 वा तर मुस्तफा याने 720 पैकी 665 गुण घेऊन देशात 2300 वा उच्चांक साधला होता. तर या वर्षीच्या परीक्षेत पुन्हा कनिष्ठ चिरंजीव अबूबकर यांने 1746 वा रँक बापाची मान उंचावली आहे. मुगुट धारवाडी यांच्या तीन चिरंजीवांनी नीट साधलेला हा उच्चांक इतर विद्यार्थ्यांना प्रेरणा देणारा आहे. शिवाय दोन मुलींनी बी एच एम एस पर्यंत शिक्षण घेऊन एकटीने डॉक्टर ही सेवेला सुरुवात केली. तर आणखी एकटीने यूपीएस कोचिंग करून उच्च शिक्षण मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहे. ही खरोखर अभिनंदन बाब आहे. खानापूर तालुक्यात एकाच बापाच्या पोटी जन्मलेल्या पाच आपत्यांनी सलगपणे डॉक्टरी सेवेत स्वतःला झोपून घेण्यासाठी नीट सारख्या अवघड अशा वैद्यकीय परीक्षेत उत्तम ज्ञानांकन व गुणात्मक शिक्षण घेऊन मिळवलेले हे श्रेय कौतुकास पात्र ठरले आहे.