IMG-20230618-WA0167

खानापूर : कर्नाटक राज्यात १ जुलै पासुन लागु होणाऱ्या गृह ज्योती योजनेची नोंदणी आज रविवारी दि. १८ पासून होत असुन महिन्याला २०० युनिट पर्यंत मोफत वीज देणाऱ्या या गृह ज्योती योजनेची सुविधा मिळविण्यासाठी सेवासिंधू पोर्टलवर आधार क्रमांक लिंक करून त्याच बरोबर मागील महिन्याची लाईट बील व आपला मोबाईल लिंक करून गृह ज्योती योजनेची सुविधा मिळू शकता. त्याचबरोबर घरमालक अथवा भाडेकरू यांना सेवासिंधू पोर्टलवर त्याचे आधार कार्ड लिंक करून गृह ज्योती योजनेची सुविधा मिळू शकते, अशी माहिती हेस्कॉमच्या कार्यकारी अभियंत्या सौ. कल्पना तिरवीर यांनी रविवारी खानापूर हेस्कॉम कार्यालयात गृह ज्योती योजनेच्या नोंदणी कार्यक्रमात बोलताना दिली. प्रारंभी हेस्कॉमचे ऑकाऊंट ऑफिसर नमित इजारी यांनी य प्रास्ताविक करून उपस्थितांचे स्वागत केले. उपस्थिताच्या हस्ते महात्मा गांधींच्या फोटो प्रतिमेचे पुजन करून गृह ज्योती योजना फलकाचे अनावरण करण्यात आले. कार्यक्रमाला हेस्कॉमचे नागेश दौलतकर, जावेद नाईकवाडी, श्री. अचिमनी, राजू पारेकर, ग्राम पंचायत प्रतिनिधी व लाईन मन, कर्मचारी वर्ग, त्याचबरोबर ऍड. अरूण सरदेसाई, प्रकाश मजगावी आदी नागरीक उपस्थित होते.

दरमहा २०० युनिटपर्यंत मोफत वीज उपलब्ध करून देणाऱ्या राज्य सरकारच्या ‘गृहज्योती’ योजनेसाठी लाभार्थी नोंदणी सुरुवात झालीआहे.योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांना सेवा सिंधू पोर्टलवर खास डिझाइन केलेल्या वेबपेजवर लॉग इन करावे लागेल. गृह ज्योती योजनेच्या नोंदणीसाठी नेट सेंटर किंवा वीज कार्यालयात जाण्याची गरज नाही. घरबसल्या मोबाईल किंवा लॅपटॉपवर नोंदणी करता येते. या व्यतिरिक्त, व्हिलेज वन, बंगलोर वन, कर्नाटक वन केंद्र किंवा कोणत्याही वीज कार्यालयात नोंदणी करता येते.

Do Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Us