IMG-20230616-WA0091

खानापूर /प्रतिनिधी: खानापूर तालुक्यात अनेक प्रकारच्या कौटुंबिक, स्थावर प्रॉपर्टी मालमत्ता, धनादेश न वटणे, सहकारी संस्थांच्या कर्जफेडीची देवाणघेवाण, अशा अनेक प्रकारच्या न्यायालयीन वादात असलेल्या प्रकरणावर योग्य तो तोडगा काढण्यासाठी येत्या 08 जुलै रोजी खानापूर जेएमएफसी न्यायालयात लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती खानापूर येथील वरिष्ठ दिवाणी न्यायालयाच्या न्यायाधीश श्रीमती झरीना यांनी शुक्रवारी बोलावलेल्या एका पत्रकार परिषदेत दिली. या पत्रकार परिषदेत न्यायमूर्ती एस. सूर्यनारायण न्यायमूर्ती वीरेश हिरेमठ तसेच तालुका वकील संघटनेचे अध्यक्ष आय.आर. घाडी उपस्थित होते.

(चुकीची दुरुस्ती: बातमीच्या मथळ्यात चुकीने 08 ते 26 जुलै पर्यंत लोक अदालत असा उल्लेख झाला आहे. केवळ 08 जुलै रोजी लोक अदालत आहे याची नोंद घ्यावी.)

यावेळी बोलताना वकील संघटनेचे अध्यक्ष आय.आर.घाडी म्हणाले, खानापूर तालुक्यात अनेक प्रलंबित प्रकरणे आहेत. यापूर्वी अनेक वेळा लोकअदालत आयोजन करून अशा प्रकरणावर तोडगे काढण्यात आले आहेत. याचा तालुक्यातील अनेक ग्राहकानी लाभ घेतला आहे. अनेकांचे संसार लोकअदालदीतून तोडगा काढून सुखी संसारी बनले आहेत. सहकारी पतसंस्थांच्या देवाणघेवाणीची प्रकरणे तडजोडीने पूर्ण करण्यात आली आहेत. त्यामुळे या लोक अदालतीचा सर्वसामान्य लोकांना तसेच सहकारी संस्थांना देखील याचा फायदा होणार आहेत. यासाठी येत्या 8 जुलै पर्यंत होणाऱ्या या लोक अदालतीत ज्या ग्राहकांची प्रकरणे न्यायालयात प्रलंबित आहेत अशा आणि उपस्थित राहून या अदालती अंतर्गत तोडगा काढून न्याय मिळवून घ्यावा असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

या पत्रकार परिषदेवेळी ॲड केशव कळेकर,ॲड. एस. के.नंदगडी, ॲड. लोकरे, ॲड इर्शाद नाइक ॲड जी. जी. पाटील, ॲड सिद्धार्थ कपलेश्वरी, ॲड. एन. वाय. कदम, ॲड. आर.एन. पाटील, आदी उपस्थित होते.

निकालात प्रकरणांचे न्यायालयीन शुल्क माफ

या लोक अदालतीत ज्या प्रकरणावर तोडगा काढण्यात येणार आहे. अशा प्रकरणांची न्यायालयीन फी माफ करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे अशा प्रलंबित प्रकरणाबाबत न्यायालय अनेकांना दंड घालून निर्धारित शुल्काची आकारणी करते,पण या लोकअदालतीत जी प्रकरणे निकालात काढली जाणार आहेत. त्या प्रकरणांना मात्र जी निर्धारित न्यायालयीन शुल्क आकारले जाते. ती माप केली जाणार असल्याचेही यावेळी न्यायाधीश यांनी सांगितले.

Do Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Us