खानापूर: तालुक्यातील निटूर येथील एका शेतकऱ्याने कर्जबाजारीपणाला कंटाळून आपल्या शेतवडीत झाडाला गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली आहे. सदर कर्जबाजारी शेतकऱ्याचे नाव कल्लाप्पा बलराम काजूनेकर वय 50 असे आहे.
मिळालेली माहिती की सदर शेतकऱ्याने कृषी पतीन सोसा. संघातून, ग्रामीण विकास बँक सह विविध संघातून जवळपास दीड ते दोन लाखापर्यंत चे कर्ज काढले होते. पण कर्ज फेडण्यास असफल असल्याने तो काही दिवसापासून मानसिक तणावाखाली होता. मंगळवारी रात्रीच्या सुमारास आपल्या शेतवडीत काजूच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केल्याचे निदर्शनाला आले आहे. सदर घटनेची नोंद खानापूर पोलीस स्थानकात झाली असून पोलीसानी घटनास्थळी पंचनामा केला आहे. त्याच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, मुलगी असा परिवार आहे.