IMG_20230613_135022

खानापूर/ प्रतिनिधी : खानापूर तालुक्यात जुन्याच समस्या आणि आव्हाने अनेक अशी परिस्थिती असल्याने मंगळवारी खानापूरचे आमदार विठ्ठल हलगेकर यांनी खानापूर तालुका पंचायत कार्यालयात अधिकाऱ्यांची विकास आढावा बैठक घेतली. या विकास आढावा बैठकीत खानापूर तालुक्यातील सर्व विभागीय अधिकाऱ्यांच्या कार्याचे कार्यप्रणाली व कामासंदर्भात अधिकाऱ्यांना कानपिचक्या देऊन तालुक्यात सर्वांगीण विकास साधण्यासाठी अधिकाऱ्यांची साथ मौलाची असल्याचे कानमंत्र दिले. या विकास आढावा (के डी पी) बैठकीला खानापूरचे तहसीलदार प्रकाश गायकवाड, तालुका पंचायत कार्यनिर्वाहक अधिकारी विरनगौड आधी उपस्थित होते.

यावेळी प्रारंभी आमदार विठ्ठल हलगेकर यांनी खानापूर तालुक्यातील सर्व विभागीय अधिकाऱ्यांची ओळख करून घेतली व गैरहजर असलेल्या अधिकाऱ्यांना नोटिसा बजावण्याचे आदेश दिले. खानापुरात विधानसभेची निवडणूक झाल्यानंतर प्रथमतः आमदार विठ्ठल हलगेकर यांनी केडीपी बैठक बोलावली. या बैठकीत तालुक्यातील अधिकाऱ्यांनी आपल्या योजनांची माहिती दिली. यावेळी झालेल्या चर्चेत प्रामुख्याने वन खात्याच्या अधिकाऱ्यांकडून रस्ते, वीज समस्या सोडवण्यासाठी येणाऱ्या अडचणीवर चर्चा झाली. तालुक्याच्या दुर्गम व जंगल भागात अनेक रस्ते, ब्रिज करत असताना वनखात्याची नेहमी अडचण असते.शिवाय हेस्कॉम खात्याकडून सुरळीत वीज पुरवठा करण्यासाठी सुधारित वीज वाहिनी घालण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. पण वन खात्याचे अधिकारी अडसर आणत आहेत. त्यामुळे आपण त्या भागात कशी कामे करणार ? असा प्रश्न हेस्कॉम खात्याच्या कार्यकारी अधिकारी कल्पना तिरविर यांनी यावेळी बैठकीत मांडला. शिवाय जिल्हा पंचायत विभाग अंतर्गत येणाऱ्या अनेक रस्त्यांची कामेही वनखाते पूर्ण करण्यास अडचण करत आहेत. असा प्रश्नही जिल्हा पंचायत अधिकाऱ्यांनी यावेळी मांडला. यावरून आमदार विठ्ठल हलगेकर यानी भीमगड अभयारण्य, कणकुंबी विभाग तसेच खानापूर विभागाच्या व नागरगाली, गोल्याळी विभागाच्या वनाधिकाऱ्यांना कानपिचक्या दिल्या.

मानवतेच्या दृष्टिकोनातून तालुक्याच्या विकासासाठी सहकार्याची भूमिका या जंगलाची हानी होणार नाही. प्राण्यांना त्रास होणार नाही याची दखल घेऊन जंगल भागात राहणाऱ्या नागरिकांच्या सुख सोयी करण्यासाठी व अडचणीच्या काळात येण्या-जाण्यासाठी चांगल्या रस्त्याची आवश्यकता आहे. शिवाय या भागात पावसाळ्यात होणारी वीज समस्या लक्षात घेता सुधारित वीज वाहिनी घालण्यासाठी हेस्कॉम खात्याला सहकार्याची भूमिका घ्या अशी सूचना वन अधिकाऱ्यांना दिली. याशिवाय कृषी खात्याचे अधिकारी डी. बी. चव्हाण, पाणीपुरवठा व निर्मल खात्याचे अधिकारी मठपती, सार्वजनिक बांधकाम खात्याचे कार्यकारी अभियंता, समाज कल्याण खाते अशा विविध खात्याच्या अधिकाऱ्यांनी आपल्या विभागांतर्गत येणाऱ्या कामाची मांडणी केली. प्रामुख्याने तालुक्यात जलजीवन मिशन योजना अनेक गावात कार्यान्वित करण्यात आले आहेत. गावातील रस्ते उखडून टाकण्यात आले आहेत. ते पूर्ण करून जलजीवन मिशन पाणी योजना ,तात्काळ दुरुस्ती हाती घ्यावी. शहरांतर्गत महामार्ग संदर्भात डागडुजी करण्यासाठी मुख्याधिकाऱ्यांना सूचना केल्या.

Do Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Us