Screenshot_20230613_103718

खानापूर प्रतिनिधी: कर्नाटक राज सीनियर सिटीजन असोसिएशन खानापूर घटक च्या वतीने सोमवारी खानापूरचे नवनिर्वाचित आमदार विठ्ठल हलगेकर यांचा श्रीफळ शाला देऊन सन्मान कार्यक्रम येथील श्री ज्ञानेश्वर मंदिरात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सीनियर सिटीजन असोसिएशनचे अध्यक्ष बनोशी सर होते. प्रारंभी उपस्थितांचे स्वागत संघटनेचे ज्येष्ठ सभासद लक्ष्मण पाटील यांनी केले. व आमदार विठ्ठल हलगेकर यांच्या कार्यप्रणालीचा गौरव व परिचय करून दिला. त्यानंतर संघटनेच्या ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांच्या हस्ते त्यांचा श्रीफळ शाल देऊन गौरव करण्यात आला. तसेच शिंदोली वृद्धाश्रमाचे संचालक गजानन घाडी यांचाही यावेळी सन्मान करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर संघटनेचे आबासाहेब दळवी, डीएम भोसले, डिचोलकर सह अनेक ज्येष्ठ मंडळी उपस्थित होती. यावेळी संघटनेचे ज्येष्ठ सी. एस. पवार यांनी उपस्थितांचे स्वागत करून सीनियर सिटीजन संघटनेच्या कार्याचा आढावा मांडला.

यावेळी बोलताना आमदार विठ्ठल हलगेकर म्हणाले, खानापूर तालुक्यात अनेक ज्येष्ठ नागरिक आहेत. प्रामुख्याने खानापूर तालुक्यातील अनेक ज्येष्ठ नागरिकांनी जेष्ठांच्या उतारवयातील हिताचा विचार करून संघटना स्थापन केली. आणि या संघटनेच्या माध्यमातून गेल्या पाच वर्षात अनेकांचे हितसंबंध उतारवयातील आधार एकमेकांना देण्याचा प्रयत्न करत आहात. प्रामुख्याने यामध्ये निवृत्त शिक्षक वर्गांचा सहभाग अधिक आहे, मी पण एक निवृत्त शिक्षक आहे. पण ज्ये ष्ठ मंडळींनी संघटित होऊन तालुक्यातील ज्येष्ठना एकमेकाचा आधार देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. हे काम असेच काम करत रहा, आपले यासाठी नेहमी सहकार राहील. शासकीय योजना आपल्यापर्यंत मिळवून देण्यासाठी माझे प्रयत्न राहतील असे विचार या सत्कार प्रसंगी त्यांनी व्यक्त केले. यावेळी संघटनेच्या कार्याबद्दल अनेक आणि विचार मांडले. कार्यक्रमात सूत्रसंचालन ज्येष्ठ सभासद बेनकट्टी यांनी केले.

Do Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Us