Screenshot_20230613_095810

खानापूर : खानापूर तालुक्यातील भुतेवाडी येथे दोन दिवसापूर्वी झालेल्या त्या वृद्धाच्या खुनाचा उलगडा नंदगड पोलिसांनी अवघ्या 24 तासातच लावला याप्रकरणी दोघांना पोलिसांनी अटक करून त्यांची हिंडलगाव कारागृहात परवानगी केली आहे.

याबाबत पोलिसांच्या तपासात मिळालेली माहिती की, शनिवारी लक्ष्मण यल्लाप्पा सुतार (वय 75) यांचा त्यांच्या राहत्या घरी रक्ताच्या थारोळ्यात पडलेला संशयास्पद मृतदेह आढळून आला होता. पण हा खून कशामुळे झाला याची स्पष्टता पोलिसांना मिळाली नव्हती. पण पोलिसांनी अधिक कसून तपासणी केली असता हा खूण जागेच्या वादातून झाला. सख्या मेहुणीच्या मुलाने अन्य एकाच्या साथीने डोक्यात दगड ठेचून व कुऱ्हाडीने घाव करून खून केल्याचे तपासात दिसून आले असून या प्रकरणी नंदगड पोलिसांनी नागोजी परशराम सुतार (वय 55) व ओंकार कृष्णा सुतार (वय 26) यांना अटक केली आहे. संशयीत आरोपी नागोजी हा मयत लक्ष्मणच्या मेहुणीचा मुलगा असून त्याचा लक्ष्मण यांच्या जागेवर डोळा होता. सदर जागा त्याला देण्यास लक्ष्मण सुतार विरोध करीत असल्याने शनिवारी ओंकार याच्या साथीने नागोजींने लक्ष्मण यांची पत्नी बाहेरगावी गेल्याची खात्री करून नागोजी आणि ओंकार यांनी घरात प्रवेश केला. त्यानंतर ओंकारने लक्ष्मण यांचे पाय धरून ठेवले तर नागोजीने त्यांच्या डोकीत दगड घातला. त्यानंतर पुन्हा कुऱ्हाडीने सपासप वार करून त्यांचा निघून खून केला. व संशय येऊ नये यासाठी त्यांनी दगड आणि कुऱ्हाड इतरत्र फेकून दिली होती. असे आता अटक केलेल्या संशयीताकडून तपासात चौकशीत दिसून आले.

घर बांधणीला अडचण केल्यानेच खून?

गेल्या कांही वर्षांपासून लक्ष्मण आणि नागोजी यांच्यात जागेवरून वाद सुरू होता. लक्ष्मण यांनी विरोध करून जागा देण्यास नकार दिल्याने नागोजीच्या मनात राग होता नागोजीने संबंधीत जागेवर घर बांधण्यासाठी नागोजीने संबंधीत जागेवर घर बांधण्यासाठी हालचाली चालविल्या होत्या. पण, पंचायतीत तक्रार दिल्याने तो अस्वस्थ झाला होता. त्यातूनच त्याने त्याचा निर्घृण खून केला. मात्र नंदगड पोलीसांनी अवघ्या काही तासात या प्रकरणाचा छडा लावून दोघांना जेरबंद करून त्या दोघांची रवानगी हिंडलागा कारागृहात करण्यात आली आहे

Do Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Us