नंदगड : नंदगड पोलीस स्थानकाच्या हद्दीत येणाऱ्या भुत्तेवाडी गावात एका सुतार काम करणाऱ्या वृद्धाचा डोक्यात वार करून खून केल्याची घटना रविवारी सकाळी उघडकीस आली आहे. सदर वयस्कर वृद्धाचे नाव लक्ष्मण यल्लाप्पा सुतार (वय 75) असे आहे. या बाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती की, लक्ष्मण यल्लाप्पा सुतार हे गेल्या अनेक वर्षापासून गावात सुतार काम करतात.पण त्यांचा रात्री डोकीत दगडाने ठेचून खून झाल्याची घटना दिसून आली आहे. सदर वृद्धाच्या डोक्यात जोरात वार केल्याने त्या चे डोके फुटले आहे. हा वार नेमका कशा शस्त्राने केला आहे. याची अद्याप कारण कळले नाही शिवाय या खुणा मागचे कारणही अद्याप समजले नसून पोलीस याचा तपास करत आहेत .घटनास्थळी नंदगड पोलीस स्थानकाचे उपनिरीक्षक व कर्मचारी यांनी उपस्थित राहून मृतदेह शल्यचिकितेसाठी शासकीय रुग्णालयात आणण्यात आला आहे.