बंगलोर नुकताच बेंगलोर येथे कंटेरवा स्टेडियमवर झालेल्या 9000 व 10000 मीटर धावण्याच्या स्पर्धेत दोन्ही गटातून प्रथम क्रमांक पटकावून दोन सुवर्णपदके पटकावण्याचा मान खानापूर तालुक्यातील बिदरभावी येथील कु. वैभव मारुती पाटील या धावपटूने मिळवला आहे. त्याच्या या यशाबद्दल त्याचे खानापूर तालुक्यातून अभिनंदन होत आहे.
बेंगलोर मध्ये शिकत असलेला व धावण्याचे ट्रेनिंग बेंगलोर येथे घेत असलेला हा एक खानापूरचे सुवर्ण रत्न आहे
कर्नाटक सांस्कृतिक व क्रीडा विभागाच्या वतीने बेंगलोर येथे कंटिंरिवा स्टेडियम येथे रविवार दि. 04 रोजी संपन्न झालेल्या धावण्याच्या स्पर्धेमध्ये कु. वैभव पाटीलने 9000 मी. व10000 मी. धावण्याच्या स्पर्धेमध्ये भाग घेऊन दोन्ही विभागात प्रथम क्रमांक घेऊन दोन सुवर्णपदके संपादन केली आहे
कर्नाटका आंतरराज्य खुल्या गटामध्ये धावण्याच्या स्पर्धा संपन्न झाल्या या स्पर्धा कर्नाटक प्रशासनामार्फत घेतल्या होत्या त्यामध्ये अनेक विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता. गर्लगुंजी गावचे ज्येष्ठ धावपटू कोच व खोखो कोच असणारे लक्ष्मणराव गोपाळराव कोलेकर यांच्या अथक प्रयत्नाने बेंगलोर स्टेडियमवर सराव करत आहे. तसेच होस्टेल व कॉलेज अल आमिन कॉलेज प्रिन्सिपल व शारीरिक शिक्षक तसेच कंटिरीवा स्टेडियमचे एन आय एस, कोच त्यांना प्रशिक्षण देत आहेत. सर्व खानापूर तालुक्यातील संघ संस्था व कर्नाटकातील अनेक लोकांनी त्याचे अभिनंदन व कौतुक केले आहे.