कावळेवाडी महात्मा गांधी वाचनालय आणि सामाजिक संस्थेतर्फे गुणगौरव समारंभ
बेळगांव: जीवनात यशस्वी होण्याकरिता अतिशय खडतर प्रयत्न करणे अत्यंत गरजेचे आहे.कोणत्या प्रकारचा मनात नेहमी ओळखता जिद्दीने देह घटनेसाठी प्रयत्न केले गेले पाहिजेत.
नियोजनपूर्वक अभ्यास करणं गरजेचं आव्हानात्मक क्षेत्र असलं तरी नियोजन करून अभ्यास केला तर स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवणं कठीण नाही. अनेक आव्हाने स्वीकारली गेली पाहिजेत तरच आपल्या मधील कुवत अधिक सक्षम होण्यास मदत होते.
कोणत्याही पदवी अभ्यासक्रमासोबत स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करताना तुम्ही विचार कशा पद्धतीने करता हे महत्त्वाचं असतं. व्यक्तिमत्त्वाला घडवायचं असेल आणि समाजासाठी काही तरी योगदान द्यायचं असेल, तर प्रशासकीय सेवेशिवाय दुसरा कोणाताही पर्याय नाही. नियोजनबद्ध प्रयत्न करून आणि त्याला मेहनतीची जोड देऊन या क्षेत्रात यश मिळवता येतंच. आव्हानात्मक क्षेत्रात यायचं असेल तर मेहनत महत्त्वाची आहे. पण हे हार्ड वर्क स्मार्टपणे करणं गरजेचं आहे. सातत्याने अभ्यास करत राहणं गरजेचं आहे. जिद्द हवी, संयम हवा. सातत्य, सकारात्मकता हवी. अपयश विसरून पुन्हा मेहनत घेण्याची तयारी हवी असे प्रतिपादन कवी पत्रकार प्रा.निलेश शिंदे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन पर व्याख्यानात केले.
राष्ट्रपिता महात्मा गांधी सामाजिक संस्था व वाचनालय कावळेवाडी ता. जि. बेळगाव विद्यार्थी गुणगौरव समारंभ आणि मार्गदर्शनपर व्याख्यानाचा कार्यक्रम रविवार दि. 4 जून रोजी श्री विठ्ठल रुक्माई मंदिर येथे संपन्न झाला.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी हिंडलगा ग्रामपंचायतच्या सदस्या रेणू पांडुरंग गावडे ह्या होत्या. प्रमुख वक्त्या म्हणून टिळकवाडी बेळगाव येथील नेक्सस इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट च्या प्राचार्या प्रीती अर्जुन पाटील, प्रमूख वक्ते म्हणून कवी प्राध्यापक निलेश एन. शिंदे, तेजस्विनी कांबळे, आर.के. ओऊळकर उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार परशुरामभाऊ नंदिहळळी, सागर भोसले पवन कांबळे, संस्थेचे अध्यक्ष निवृत्त प्राचार्य वाय. पी. नाईक व्यासपीठावर उपस्थित होते.
यावेळी बेळगांव जिल्हा पंचायत चे माजी सदस्य आणि शिक्षण आणि आरोग्य स्थायी समितीचे माजी अध्यक्ष मोहन मोरे यांच्या मातोश्री गंगुबाई मोरे, वनिता कणबरकर, प्रतीक्षा येळूरकर, प्रा. प्रीती अर्जुन पाटील यांच्या हस्ते विविध दैवतांच्या प्रतिमांचे पूजन झाले.
यावेळी स्वस्तिक मोरे ( पैलवान ), निशिगंधा मोरे ( एम.कॉम.) , भारत मोरे (आर्मी ) यशवंत जाधव (सामाजिक कार्यकर्ते ) , कुमार बाचीकर (भारतीय नौदल ), स्वाती कांबळे , अविनाश कांबळे यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
स्वागत संगीता कनबरकर यांनी केले. प्रास्ताविक संस्थेचे अध्यक्ष निवृत्त प्राचार्य वाय. पी. नाईक यांनी केले. प्रमुख पाहुण्यांचा परिचय आरती मोरे आणि कांचन सावंत यांनी करून दिला. यावेळी प्रमुख वक्त्या प्राचार्या प्रीती अर्जुन पाटील, प्रमूख वक्ते म्हणून कवी प्राध्यापक निलेश एन. शिंदे, तेजस्विनी कांबळे, आर.के. ओऊळकर यांची भाषणे झाली. कावळेवाडी – बेळगुंदी पंचक्रोशीतील एसएससी च्या परीक्षेत 80 टक्के पेक्षा अधिक गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा विषेश सत्कार करुणा भास्कळ ( बिजगर्णी ), प्रेरणा मुंजोळे ( बेळवटी ), सुदेश पाटील व रोहिणी पाटील ( कर्ले ) , निखिल कनबरकर ( विज्ञान विकास हायस्कूल महाद्वार रोड बेळगांव ), रूपाली मोटर ( रागास्कोप ), मंथन पाटील ( बेळगुंदी ) , गौरी शहापूरकर ( बेळगुंदी ), प्रणाली मोरे ( कावळेवाडी ) , हर्षद भैरटकर ( विद्या विकास हायस्कूल महाद्वार रोड) बेळगांव यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
यावेळी केदारी कनबरकर, मोनाप्पा गावडे मोरे पांडुरंग सातेरी मोरे अविनाश कांबळे यशवंत मोरे , कल्लाप्पा येळूरकर, मुकुंद ओऊळकर, गोपाळ जाधव मंगांना कार्वेकर तसेच गावातील विविध मंडळाचे पदाधिकारी सदस्य ग्रामस्थ, प्राध्यापक, शिक्षक, विद्यार्थी, पालक आणि हितचिंतक शिक्षणप्रेमी आणि मोठ्या प्रमाणात रसिक उपस्थित होते. सूत्रसंचालन सुरज मोरे व दौलत कनबरकर यांनी केले. आभार ॲड. मनोहर मोरे यांनी मानले.