बिडी : बिडी आळणावर या राजमार्गावरील गोल्याळी वन खात्याच्या चेक पोस्ट नाक्यापासून जवळ असलेल्या एका अपघात प्रणव वळणावर दुचाकीची बसला धडक बसून झालेल्या अपघातात जखमी झालेल्या एकाचा दुपारी उपचाराअभावी मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेल्या युवकाचे नाव यल्लाप्पा प्रकाश हुन्नूर वय 25 असे आहे. तर उर्वरित तिघांच्यावर उपचार सुरू असून यापैकी पल्लवी मारुती हुन्नूर या युवतीचा पाय अपघात स्थळी गुडघ्यापासून तुटून पडला होता .तर ऐश्वर्या हुन्नूर या युवतीचा गुडघ्यात पाय फ्रॅक्चर झाला आहे. त्यांच्यावर जिल्हा हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. तर भिमापा बसपा हुन्नूर हे सुखरूप असल्याची बातमी मिळाली आहे.
दुर्दैवी मयत यल्लाप्पा यांच्या सख्या मोठ्या भाऊचे दोन दिवसांपूर्वी लग्न झाले होते. या लग्नासाठी त्यांचे काका भीमाप्पा हुन्नूर हे आळणावर जवळील बेंची येथून कडतन बागेवाडीला आले होते. भीमाप्पा हे मुळचे करताना बागेवाडीचेच. पण बंची या ठिकाणी पत्नीच्या गावी ते राहतात. ते लग्नाच्या निमित्ताने कु.पल्लवी, ऐश्वर्या यांना सोबत घेऊन लग्नाला आले होते. लग्न उरकून ते बंचीला परत जात असताना यल्लाप्पाने त्यांना दुचाकीवरून सोडण्याचा हट्टाहास केला पण तो जीवावरच घेतला.
एकच दुचाकी वरून चार जणांचा प्रवास आला अंगलट
कडतन बागेवाडी येथील यल्लाप्पा हुन्नूर त्यांच्या घरी लग्नाचा कार्यक्रम संपवून चौघेजण एका दुचाकीवरून बेंची गावी जात होते. बिडीहून जाण्यासाठी वेळीच बस मिळाली नसल्याने एकाच दुचाकीवरून यल्लाप्पा हुन्नूर यांनी अन्य तिघांना बसून घेणे पसंत केले. व सोबत असलेली एक पिशवी समोरील स्टेरिंग जवळ ठेवली होती. पण काळ धावून आला होता. गोल्याळी पासून अर्धा किलोमीटर अंतरावर असलेल्या धोकादायक वळणदार समोर ठेवलेली पिशवी अडकल्याने दुचाकी सावरली नाही. त्यामुळे समोरून येणाऱ्या हल्ल्याळ बेळगाव या परिवहन खात्याच्या बसला ठोकल्याने हा गंभीर अपघात घडला आहे. असे प्रत्यक्ष दर्शनींनी सांगितले.
ही धडक इतकी भयानक होती, की त्यात यल्लाप्पा हुन्नूर याचा पाय कमरेपासून पूर्णतः तुटून पडला होता. तर त्याच ठिकाणी पल्लवीचा देखील उजवा पाय गुडघ्यापासून तुटून रक्तबंबाळ झाली होती. अपघातातील भीमाप्पा व ऐश्वर्या यांची प्रकृती धोक्याबाहेर असली तरी पल्लवीचा पाय तुटल्याने अधिक रक्तबंबाळ होऊन ती अस्वस्थ झाली होती तिच्यावरही उपचार सुरू आहेत. कुमारी ऐश्वर्या व पल्लवी या दोन्ही युवतीला या अपघातामुळे लग्नापूर्वीच अपंगत्व आले आहे. यामुळे हळहळ व्यक्त होत आहे. अपघात स्थळी रक्ताचा एकच सडा पडला होता. नंदगड पोलिसात घटनेची नोंद झाली आहे.